कुंजवन कोविड केंद्राची राज्यमंत्री यड्रावकर यांनी केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:24 AM2021-04-17T04:24:17+5:302021-04-17T04:24:17+5:30
उदगाव : शिरोळ तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी शिरोळ तालुका प्रशासन व आरोग्य विभागाच्या ...
उदगाव : शिरोळ तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी शिरोळ तालुका प्रशासन व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी घेतली होती. त्यावेळी कुंजवन उदगाव येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मागील काही दिवसांत रुग्णांची वाढत असलेली संख्या लक्षात घेऊन शिरोळ तालुका प्रशासन व आरोग्य विभागाने कुंजवन उदगाव येथे ५० खाटांचे कोविड केअर केंद्र शुक्रवारपासून सुरू केले.
राज्यमंत्री यड्रावकर यांनी या केंद्राला भेट देऊन लसीकरणाबाबतीत शिरोळ तालुका मागे पडला आहे. तत्काळ त्यावर पावले उचलावीत व लसीकरणाचा वेग वाढवावा, असे सांगून आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या. तालुका आरोग्याधिकारी पी. एस. दातार यांनी सेंटरवर सध्या ५० बेड उपलब्ध करून दिले असून यांपैकी १४ ऑक्सिजन बेड असल्याचे सांगितले.
याप्रसंगी तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे, गटविकास अधिकारी शंकर कवितके, सरपंच कलिमून नदाफ, सलीम पेंढारी, सुवर्णा सुतार, बंडेश कोळी उपस्थित होते.
फोटो - १६०४२०२१-जेएवाय-०६
फोटो ओळ - उदगाव (ता. शिरोळ) येथे कोविड केअर केंद्राला आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.