मंत्री यड्रावकर यांनी स्टंटबाजी करून व्यापाऱ्यांशी खेळू नये : राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 12:53 PM2021-07-09T12:53:41+5:302021-07-09T12:57:44+5:30
Raju Shetty Kolhapur : अत्यावश्यक सेवा वगळून इतर व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली असल्याचे आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जाहीर केले होते. परंतु, शुक्रवारी सकाळी पोलीस प्रशासनाने शहरात व्यवसाय बंद करावा अन्यथा कारवाई करणार असा इशारा दिला.
इचलकरंजी : अत्यावश्यक सेवा वगळून इतर व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली असल्याचे आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जाहीर केले होते. परंतु, शुक्रवारी सकाळी पोलीस प्रशासनाने शहरात व्यवसाय बंद करावा अन्यथा कारवाई करणार असा इशारा दिला.
मंत्री यड्रावकर यांनी कशाच्या आधारावर घोषणा केली. तसेच मंत्री यड्रावकर यांनी स्टंट बाजी करत व्यापाऱ्यांशी खेळू नये असा सल्ला देत माजी खासदार राजू शेट्टी यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सोमवारी प्रांत कार्यलयात निवेदन देऊन दुकाने सुरू करणार असल्याचे जाहीर केले.
तीन महिन्यांच्या वर छोटे मोठे व्यवसाय बंद आहेत. याबाबत शहरातील व्यापारी संघटनेच्या पोलीस प्रशासनासोबत सहा बैठका झाल्या. परंतु अजूनही तोडगा निघाला नाही. माजी खासदार शेट्टी यांनी शुक्रवारी दुकाने सुरू करणार असा इशारा दिला होता.
मंत्री यड्रावकर यांनी शुक्रवारी दुकाने सुरू करण्यास सांगितले होते. त्यानुसार व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू करताच पोलीस प्रशासनाने बंद करण्याचे आवाहन करत कारवाईचा इशारा दिला. दरम्यान, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शेट्टी, आवाडे व व्यापारी यांची बंद खोलीत बैठक घेण्यात आली.
कोल्हापूर मधील दुकान धारकांनी आंदोलने करताच पालकमंत्री सतेज पाटील त्यांनी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून परवानगी दिली. पालकमंत्री यांनी सगळीकडेच परवानगी देणे गरजेचे होते असे आमदार प्रकाश आवाडे म्हणाले.