Kolhapur Crime: भानामती करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, भोंदू बाबासह तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 11:44 IST2025-04-07T11:44:20+5:302025-04-07T11:44:42+5:30
कोडोली : भानामती करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सांगरुळ येथील भोंदू बाबा राजू उर्फ राजाराम भिकाजी तावडे (वय ४८ ...

Kolhapur Crime: भानामती करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, भोंदू बाबासह तिघांना अटक
कोडोली : भानामती करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सांगरुळ येथील भोंदू बाबा राजू उर्फ राजाराम भिकाजी तावडे (वय ४८ ) या मांत्रिकाला आणि त्याला सहकार्य करणारा वाहन चालक मनोज सावंत (रा. भादोले, ता. हातकणंगले ) तसेच सुप्रिया हिम्मत पोवार ( रा.सातवे, ता.पन्हाळा) यांना कोडोली पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत शाहूवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय घेरडे अधिक तपास करत आहेत.
अधिक माहिती अशी, पीडित अल्पवयीन मुलगी हातकणंगले तालुक्यातील आहे. सातवे येथील आळोबानाथ महिला शेळी-मेंढी पालन संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया पोवार यांची पीडितेच्या आईशी ओळख झाली. त्यातून तिला अर्थसाहाय्य करण्याचे आमिष दाखवत पीडित मुलीला संस्थेत नोकरीवर ठेवले होते. पीडित मुलगी कामावर रुजू झाल्यानंतर आरोपी पोवार हिने सांगरूळ येथील भोंदू बाबा राजू तावडे याला बोलावून घेऊन पीडितेची भेट घालून दिली.
पीडित मुलीस तिघांनी विश्वासात घेऊन भोंदू बाबा मंत्राच्या साहाय्याने जादू टोणा, पूजा करतात. यातून चांगले होईल असे आमिष दाखवून तिला अघोरी पूजेला बसवले होते. भोंदू बाबा राजू तावडे याने चार महिन्यांपासून पीडितेवर अत्याचार करायला सुरुवात केली होती. पीडितेने घडलेली घटना आईला सांगितल्यावर या दोघींनी ह्यूमन राईटस संस्थेच्या मदतीने आरोपी विरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून कोडोली पोलिसांनी गुन्हा दाखल झाला. कोडोली पोलिसांनी संशयित तिघांना अटक केली.