मिरज : मिरजेतील सावकारावर सांगलीत गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 11:47 AM2018-09-29T11:47:35+5:302018-09-29T11:56:54+5:30
मिरजेत पंढरपूर रस्त्यावर चोरट्यांनी बंगला फोडून दहा तोळे दागिने, दीड लाख रोकड असा साडेसात लाखाचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिरज : मिरजेत पंढरपूर रस्त्यावर चोरट्यांनी बंगला फोडून दहा तोळे दागिने, दीड लाख रोकड असा साडेसात लाखाचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिरजेत पंढरपूर रस्त्यावर तंदुरी ढाब्याच्या पिछाडीस महंमद खान यांचा बंगला आहे. शिरढोण येथे ढाब्याचा व्यवसाय असल्याने खान कुटुंबीय तेथेच वास्तव्यास आहे. गुरूवारी मध्यरात्री खान यांच्या बंद बंगल्याच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. बेडरूममधील लोखंडी तिजोरी व कपाटे फोडून सोन्याचे गंठण, चेन, अंगठ्या, कर्णफुले असे दहा तोळे दागिने, दीड लाख रोख रक्कम चोरून नेण्यात आली.
शेजारी राहणारे खान यांचे भाऊ अहमद खान यांना सकाळी बंगल्याचा दरवाजा उघडा दिसल्याने घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. बेडरूमधील कपाट कटावणीने उचकटून आतील दागिने लंपास केले. चोरट्यांनी बंगल्यातील बेडरूमसह आठ खोल्यांची कुलपे तोडली. बेडरूममधील लोखंडी तिजोरी व प्रत्येक खोलीतील कपाटे फोडून सर्व साहित्य विस्कटून टाकले. चोरीच्या घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांनी श्वानपथक आणून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. बंगल्याजवळ असलेल्या ओढ्यातून पाटील मळ्यापर्यंत श्वानाने माग काढला. चोरट्यांनी चोरी करून वाहनाने पलायन केल्याचा पोलिसांचा संशय आहे.
याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूध्द महंमद खान यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.बेन्टेक्सचे दागिनेही नेलेचोरट्यांनी सोने व रोख रक्कम असलेली तिजोरी गादीवर ठेवून फोडली. घटनास्थळी चाकू व कटावणी चोरटे सोडून गेले. सोन्याच्या दागिन्यांसोबत बेंटेक्सचे दागिनेही चोरटे सोबत घेऊन गेले. तीन ते चार चोरट्यांनी चोरीचे कृत्य केल्याचा पोलिसांचा संशय आहे. चोरीप्रकरणी सराईत गुन्हेगारांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.