संभाजी महाराजांविषयी चुकीची माहिती; शिवसेना, राष्ट्रवादी नगरसेवक आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:47 AM2021-02-28T04:47:54+5:302021-02-28T04:47:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : मलकापूर नगरपालिकेच्या अंदाजपत्रकात छत्रपती संभाजी महाराजांविषयी चुकीची महिती छापणाऱ्या पालिकेच्या प्रशासन व सत्ताधारी नगरसेवकांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : मलकापूर नगरपालिकेच्या अंदाजपत्रकात छत्रपती संभाजी महाराजांविषयी चुकीची महिती छापणाऱ्या पालिकेच्या प्रशासन व सत्ताधारी नगरसेवकांना पालिकेच्या शिवसेना राष्ट्रवादी आघाडीने जाब विचारून त्यांचा निषेध नोंदवून सभात्याग केला. पालिकेच्या प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. पालिकेची विशेष अंदाजपत्रकीय सभा आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अमोल केसरकर होते.
पालिकेच्या अंदाज पत्रकाच्या प्रस्ताव नेत छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी अवमानकारक मजकूर छापला कसा? असा प्रश्न विरोधी पक्षनेते बाबासाहेब पाटील , गटनेत्या माया पाटील यांनी विचारला. जनसुराज्य भाजप च्या सत्ताधारी गटाला याचे उत्तर देता आले नाही. नगराध्यक्ष अमोल केसर कर यांनी चुकीचा इतिहास लिहिणाऱ्याची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. तरीदेखील विरोधी नगरसेवकांनी सभात्याग केला. विशेष सभेला प्रभारी मुख्याधिकारी अनुपस्थित होते. सत्ताधारी गटाने दोन तासाने परत सभा बोलावली पालिकेचे २०२० वे २१ सालाचे ६ लाख ७५४ रुपयाचे शिलकी अंदाजपत्रक मंजूर केले. सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या.
चुकीचा इतिहास लिहिणाऱ्या प्रशासनाची चौकशी करून कडक कारवाई करणार.
अमोल केसरकर, नगराध्यक्ष
छत्रपती संभाजी महाराजांचा चुकीचा इतिहास मांडणाऱ्या सत्ताधारी गटाचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत.
बाबासाहेब पाटील, विरोधी पक्षनेते