मल्टीस्टेटवरून पालकमंत्र्यांकडून सभासदांची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:23 AM2021-04-16T04:23:39+5:302021-04-16T04:23:39+5:30

कोल्हापूर : आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महा‍देवराव महाडिक यांनी गोकुळ मल्‍टीस्‍टेटचा विषय वार्षिक सर्वसाधारण सभेत संपवला ...

Misleading the members by the Guardian Minister from the multistate | मल्टीस्टेटवरून पालकमंत्र्यांकडून सभासदांची दिशाभूल

मल्टीस्टेटवरून पालकमंत्र्यांकडून सभासदांची दिशाभूल

Next

कोल्हापूर : आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महा‍देवराव महाडिक यांनी गोकुळ मल्‍टीस्‍टेटचा विषय वार्षिक सर्वसाधारण सभेत संपवला आहे. परंतु कालबाह्य झालेला विषय पुन्‍हा उकरून काढून पालकमंत्री सतेज पाटील सभासदांची दिशाभूल करीत आहेत, असा पलटवार गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

पत्रकात आपटे यांनी गोकुळच्‍या सर्वसाधारण सभेत मल्‍टीस्‍टेट हा विषय पी. एन. पाटील व महाडिक यांच्या सूचनेवरूनच रद्द झाला आहे. सभासदांच्‍या अडचणींचा जो विषय असेल तो आम्‍ही घेणार नाही व यापूर्वीही घेतलेला नाही. ज्‍यांनी मल्‍टीस्‍टेटचा विषय सर्वसाधारण सभेत घेतला ते स्‍वतः त्‍यांच्‍यासोबत आहेत. गोकुळ हा शेतकऱ्यांच्‍या मालकीचा असून शेतकऱ्यांच्‍या हिताचेच निर्णय गोकुळमध्‍ये घेतले जातात. शेतकऱ्यांना आणखी जादा दर देता यावा यासाठीच संघ मल्‍टीस्‍टेट करण्‍याचा मुद्दा पुढे आला होता. आता तो मागे पडला आहे, पण विरोधक शिळ्या कढीला ऊत आणत आहेत. सभासदांनी त्‍यांची वक्‍तव्ये गांभीर्याने घेऊ नयेत, असे आवाहनही केले आहे.

चौकट ०१

मल्टीस्टेट संस्था असणारेच विरोधात बोलतात

ज्‍यांच्‍या संस्‍था मल्‍टीस्‍टेट आहेत तेच गोकुळच्‍या विरोधात बोलत आहेत हे हास्‍यास्‍पद आहे, असा टोला आपटे यांनी विरोधकांचे नाव न घेता लगावला आहे. मंडलिक कारखाना मल्‍टीस्‍टेट, वारणा दूध संघ मल्‍टीस्‍टेट, संताजी घोरपडे खासगी, बंद पडलेला महालक्ष्‍मी दूध संघ मल्‍टीस्‍टेट अशा नेत्‍यांना गोकुळवर बोलण्‍याचा नैतिक अधिकार नाही. सर्वसामान्‍य सभासदांना आम्‍ही चांगल्‍या कारभाराचा विश्‍वास दिला आहे. ते आमच्‍यासोबत आहेत, असा विश्‍वास आपटे यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Misleading the members by the Guardian Minister from the multistate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.