विशाळगड अतिक्रमणप्रश्नी प्रशासनाकडून दिशाभूल, महायुतीचे खासदार धैर्यशील माने यांची प्रतिक्रिया

By भीमगोंड देसाई | Published: July 18, 2024 12:51 PM2024-07-18T12:51:42+5:302024-07-18T12:52:56+5:30

कोल्हापूरला, शासनाला बदनाम करण्यासाठी दंगली घडवल्या जातात का ?

Misled by Vishalgarh encroachment issue administration, reaction of Mahayuti MP Darhysheel Mane | विशाळगड अतिक्रमणप्रश्नी प्रशासनाकडून दिशाभूल, महायुतीचे खासदार धैर्यशील माने यांची प्रतिक्रिया

विशाळगड अतिक्रमणप्रश्नी प्रशासनाकडून दिशाभूल, महायुतीचे खासदार धैर्यशील माने यांची प्रतिक्रिया

कोल्हापूर : विशाळगडावर १५८ अतिक्रमण आहेत. त्यापैकी सहा जणच न्यायालयात गेले आहेत. तरीही प्रशासन अतिक्रमणाचा विषय न्यायप्रविष्ठ असल्याची दिशाभूल करीत राहिले. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वच गडावरील अतिक्रमण काढावे, अशी मागणी असणार आहे, अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली. वारंवार दंगली घडवून कोल्हापूरला, शासनाला, संभाजीराजे छत्रपती यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे का ? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

विशाळगड अतिक्रमणप्रश्नी झालेल्या दंगलीवर आपली भूमिका मांडण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी पाठपुरावा करीत होते. प्रशासन त्याकडे दूर्लक्ष केले. त्यांची यापूर्वीची सर्व आंदोलने, मोर्चे संयमी होते. विशाळगडावरील अतिक्रम काढावे, या मागणीसासाठी संभाजीराजे जाण्यापूर्वीच दंगल झाली. याचे समर्थन करणार नाही. मात्र प्रशासनाने हलगर्जीपणा आणि दुर्लक्षपणामुळे चुकीचा प्रकार घडला. दंगली घडवून राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी कोणी सक्रिय आहेत, का याचाही शोध घेण्याची गरज आहे.

Web Title: Misled by Vishalgarh encroachment issue administration, reaction of Mahayuti MP Darhysheel Mane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.