बेपत्ता प्राध्यापक मृतावस्थेत आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:19 AM2021-06-04T04:19:57+5:302021-06-04T04:19:57+5:30
कोल्हापूर : दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता झालेले निवृत्त प्राध्यापक प्रा. बी. एम. पाटील (वय ६० रा. निकम पार्क, देवकर ...
कोल्हापूर : दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता झालेले निवृत्त प्राध्यापक प्रा. बी. एम. पाटील (वय ६० रा. निकम पार्क, देवकर पाणंद, कोल्हापूर) हे बुधवारी रात्री शेंडा पार्क परिसरात कृष्ठधामच्या पिछाडीस मृतावस्थेत आढळून आले. याची नोंद राजारामपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे. ते न्यू कॉलेजमध्ये मानसशास्त्राचे शिक्षक होते. गेल्याच वर्षी ते सेवानिवृत्त झाले होते. गुरुवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई असा परिवार आहे.
प्रा. पाटील हे ३१ मे रोजी घरातून बेपत्ता झाले होते. नातेवाइकांनी शोधाशोध केली; पण ते सापडले नाहीत. मंगळवारी (दि. १जून) रोजी त्यांची बेपत्ता झाल्याची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन राजेंद्रनगर परिसरात दिसत होते, त्यानुसार पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. बुधवारी सायंकाळी शेंडा पार्क परिसरात कृष्ठधामच्या पिछाडीस निर्जनस्थळी त्यांचा मृतदेह बेवारस स्थितीत मिळाला. त्यानुसार पोलिसांनी उत्तरणीय तपासणीअंती रात्री तो नातेवाइकांच्या ताब्यात दिला. गुरुवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कर करण्यात आले.