फेरफार नोंदवही गायब; कोतवालासह दोघांवर गुन्हा
By admin | Published: September 17, 2014 11:16 PM2014-09-17T23:16:15+5:302014-09-17T23:43:27+5:30
तपासाअंती याचा सूत्रधार उघडकीस येण्याची शक्यता
पट्टणकोडीली : तलाठी कार्यालयातील फेरफार नोंदवही गायब झाल्याप्रकरणी तलाठी कार्यालयाचा कोतवाल साताप्पा रामाण्णा (रा. पट्टणकोडोली) व अंशकालीन कर्मचारी दत्ता कोळी (रा. इचलकरंजी) यांच्याविरोधात हुपरी पोलिसांत संशयित म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या विरोधात तलाठी गजानन माळी यांनी फिर्याद दिली आहे. तलाठी कार्यालयाशी निगडित व्यक्तीवरच गुन्हा दाखल झाल्याने तपासाअंती याचा सूत्रधार उघडकीस येण्याची शक्यता आहे.
पट्टणकोडीली तलाठी कार्यालयाची फेरफार नोंदवही मंगळवारी (दि. ९) गायब झाल्याचे उघडकीस आले. एका व्यक्तीकडून या वहीबाबत विचारणा झाल्याने तलाठी माळी खडबडून जागे झाले व त्यांनी वहीची शोधाशोध सुरू केली. वही गायब प्रकरणामुळे अनेक शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.