रिलायन्स फौंडेशन, चैतन्य शिक्षण मंडळाचे गरजूंसाठी ‘मिशन अन्नसेवा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:24 AM2021-05-24T04:24:28+5:302021-05-24T04:24:28+5:30
कोरोनाच्या काळात सामाजिक जबाबदारी म्हणून रिलायन्स फौंडेशनने गरजू व्यक्तींना मदत व्हावी या हेतूने मिशन अन्नसेवा हा उपक्रम देशभर ...
कोरोनाच्या काळात सामाजिक जबाबदारी म्हणून रिलायन्स फौंडेशनने गरजू व्यक्तींना मदत व्हावी या हेतूने मिशन अन्नसेवा हा उपक्रम देशभर सुरू केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात या उपक्रमासाठी श्री चैतन्य शिक्षण प्रसारक मंडळ सहकार्य करीत आहे. आतापर्यंत सुमारे दोनशे कुटुंबीयांना मदत पोहोचविण्यात आली आहे. या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिष कदम यांच्या हस्ते धान्य किटचे वाटप करण्यात आले. कोरोना महामारीच्या काळात सामाजिक बांधिलकी जपणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या उपक्रमामध्ये विनायक पाटील, राजेंद्र मकोटे, अनिल निगडे, विशाल फुले, रवींद्र कोमटी, जितेंद्र कुबडे, बाबा नेर्ले, राजेंद्र शिंदे, दीपक शिंदे, युवराज तिवले, सौरभ सावंत, सतीश हवालदार, विशाल पवार, राजू आडनाईक, निशांत सुतार, अमर देसाई, आदी कार्यरत आहेत.
चौकट
आतापर्यंत दोनशे कुटुंबीयांना मदत
या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत सुमारे दोनशे कुटुंबीयांना धान्य किटची मदत करण्यात आली. त्यामध्ये बेरोजगार कामगार, फेरीवाले, सुरक्षारक्षक, सेक्स वर्कर, घरगुती मोलकरणी, तृतीयपंथी, गवंडी, सेंट्रीग कामगार, ज्येष्ठ नागरिक, बेघर यांचा समावेश आहे. सुमारे एक हजार गरजूंना मदत केली जाणार असल्याचे कदम यांनी सांगितले.
फोटो (२३०५२०२१-कोल-चैतन्य शिक्षण मंडळ) : कोल्हापुरात कोरोनाच्या सध्याच्या काळात गरजूंना रिलायन्स फौंडेशन व श्री चैतन्य शिक्षण प्रसारक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन अन्नसेवा’उपक्रमाअंतर्गत धान्य किटचे वाटप केले जात आहे.
===Photopath===
230521\23kol_2_23052021_5.jpg
===Caption===
फोटो (२३०५२०२१-कोल-चैतन्य शिक्षण मंडळ) : कोल्हापुरात कोरोनाच्या सध्या काळात गरजूंना रिलायन्स फौंडेशन व श्री चैतन्य शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन अन्नसेवा’उपक्रमाअंतर्गत धान्य किटचे वाटप केले जात आहे.