आमदार आबिटकर यांची कूर येथे आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:17 AM2021-06-23T04:17:40+5:302021-06-23T04:17:40+5:30
यावेळी गावातील सर्व नागरीकांची अँटिजन टेस्ट घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. प्राथमिक लक्षणे असणाऱ्या रुग्णांना अलगीकरण केंद्र सुरू करून तत्काळ ...
यावेळी गावातील सर्व नागरीकांची अँटिजन टेस्ट घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. प्राथमिक लक्षणे असणाऱ्या रुग्णांना अलगीकरण केंद्र सुरू करून तत्काळ ॲडमिट करणे, सुपर स्प्रेडर रुग्णांचा वेळीच शोध घेवून उपचार करणे, तसेच खासगी डॉक्टरांनी कोरोनासदृश लक्षणे असणाऱ्या रुग्णांचा स्वॅब घेवूनच उपचार करण्याच्या सूचना केल्या.
आमदार आबिटकर म्हणाले, नागरिकांनी घाबरून न जाता वेळेत उपचार करावेत व मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर राखावे, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असे आवाहन केले.
यावेळी तहसीलदार अश्विनी अडसूळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन एत्नाळकर, माजी उपसभापती मदन देसाई, सरपंच दत्तात्रय हळदकर, उपसरपंच सुरेंद्र धोंगडे, माजी सरपंच अनिल हळदकर, धनाजी देसाई, आरोग्य सेवक बाबुराव म्हांगोरे, मंडल अधिकारी राहुल शिंदे, तलाठी विशाल पाटील, ग्रामसेवक सचिन बारड, पोलीस पाटील युवराज धोंगडे, मदन पाटील आदी उपस्थित होते.