आमदार आवाडे यांनी घेतला ‘आयजीएम’चा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:23 AM2021-04-17T04:23:33+5:302021-04-17T04:23:33+5:30
इचलकरंजी : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ती रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. गरज भासल्यास ...
इचलकरंजी : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ती रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. गरज भासल्यास कामगार मंडळाची इमारत व डीकेटीई इंग्लिश मीडियम हायस्कूल (जुनी शाळा नं. ८) येथे कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली.
येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात २८० खाटांची उपलब्धता असून, तेथे २२८ रुग्ण उपचार घेत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार आवाडे यांनी रुग्णालयास भेट दिली. डॉ. रविकांत शेट्ये यांनी रुग्णालयात सध्या सुरू असलेल्या रुग्णसंख्येसह कोरोना तपासणीसाठी नागरिकांची संख्या वाढत असून, अपुऱ्या स्टाफमुळे ताण पडत आहे. त्यामुळे लॅब टेक्निशिएन, एक्स-रे टेक्निशियन, आदी स्टाफची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर आमदार आवाडे यांनी आज, शनिवारपासून स्टाफ कार्यरत करण्याची जबाबदारी घेतली. यावेळी आरोग्य सभापती संजय केंगार, पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे, सुनील पाटील, कपिल शेटके, सर्जेराव हळदकर, आदी उपस्थित होते.
फोटो ओळी
१६०४२०२१-आयसीएच-०१
इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आमदार प्रकाश आवाडे यांनी भेट देऊन तेथील कामाचा आढावा घेतला.