आमदार चंद्रकांत जाधव यांचा मदत कक्ष पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:26 AM2021-04-08T04:26:06+5:302021-04-08T04:26:06+5:30
कोरोना रुग्णांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याची गरज आहे. शहरात महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने उपचार व मदतकार्य सुरू ...
कोरोना रुग्णांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याची गरज आहे. शहरात महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने उपचार व मदतकार्य सुरू आहे. कोरोनासह आरोग्यविषयक व प्रशासकीय कामकाजातील कार्यालयीन अडचणी दूर करण्यासाठी हे मदत कक्ष सुरू केले आहे. नागरिकांच्या अडचणींचे निराकरण तातडीने केले जावे, तत्काळ मदत मिळावी, यासाठी स्वतंत्र टीम सक्रिय केली आहे. त्यामध्ये रोहित पाटील, उदय जाधव, युवराज उलपे, युवराज पाटील यांचा समावेश आहे. ही टीम मोबाईलद्वारे नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले. दरम्यान, गेल्यावर्षी जुलै ते ऑक्टोबरदरम्यान आमदार जाधव यांचे मदत कक्ष सुरू होते. या काळात रुग्णांना वैद्यकीय मदत, बेड उपलब्ध करून देण्यासह सर्व प्रकारचे सहाय्य नागरिकांना मदत कक्षातून झाले होते.
चौकट
घरीच सुरक्षित राहा
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने नागरिकांनी घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करावे. गरज असेल, तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन आमदार जाधव यांनी केले.