शेंडापार्क येथे दोनशे बेडचे कोरोना रुग्णालय सुरू करा आमदार चंद्रकांत जाधव यांची सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:24 AM2021-05-08T04:24:43+5:302021-05-08T04:24:43+5:30
कोल्हापूर : सीपीआरच्या अधिपत्याखाली शेंडापार्क येथे दोनशे बेडचे कोरोना रुग्णालय सुरू करावे, अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी ...
कोल्हापूर : सीपीआरच्या अधिपत्याखाली शेंडापार्क येथे दोनशे बेडचे कोरोना रुग्णालय सुरू करावे, अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना केली.
कोल्हापुरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील संसर्ग अधिक तीव्र आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत रोज वाढ होत आहे; मात्र त्या तुलनेत वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याचे चित्र आहे. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय सीपीआर येथील बेड फुल्ल आहेत. यामुळे सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील रुग्णांची परवड होत आहे. बेड शोधण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची फरपट होत आहे तर उपचाराअभावी रुग्णांचे हाल होत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट येण्याची शक्यताही वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील वैद्यकीय यंत्रणा वाढविणे गरजेचे आहे. कारण कोरोनावरील औषधोपचाराचा खर्च सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील रुग्णांना पेलणार नाही. त्यामुळे सीपीआरच्या अधिपत्याखाली शेंडापार्क येथे दोनशे बेडचे सुसज्ज असे कोरोना रुग्णालय सुरू करावे. त्यामुळे कोरोना रुग्णांना उपचाराची सोय उपलब्ध होईल असा विश्वास आमदार जाधव यांनी व्यक्त केला.