आमदार पी. एन. पाटील यांच्या वाढदिवस विशेष पुरवणीसाठी लेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:25 AM2021-01-03T04:25:30+5:302021-01-03T04:25:30+5:30
----०--- "करवीर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे आमदार पी. एन. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख प्रसिद्ध करीत ...
----०---
"करवीर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे आमदार पी. एन. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख प्रसिद्ध करीत आहे." ( फोटो वापरावा )
शब्दांकन - शिवराज लोंढे
लोकराजा राजर्षी शाहू महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू, महात्मा गांधी या थोर नेत्यांच्या आदर्श विचारधारा आत्मसात करून जनतेच्या लोकहितासाठी राजकीय कुरुक्षेत्रावर यशस्वी वाटचाल करणारे काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून आमदार पी. एन. पाटील यांना उभा महाराष्ट्र ओळखतो. पुरोगामी विचारांची मनाशी खुणगाठ बांधून सार्वजनिक जीवनात एक तत्त्वनिष्ठ लोकहितवादी नेतृत्व उदयास आले आहे. गांधी घराण्याशी निष्ठा, नि:स्वार्थी स्वभाव, स्वच्छ चारित्र्य, जनहितासाठी सदैव काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नेहमी कार्यरत पी. एन. पाटील आहेत. तत्त्वज्ञानी बाळणारा प्रामाणिक नेता म्हणून पी. एन. पाटील यांचा नावलौकिक आहे .
करवीर तालुक्यातील सडोली खालसा गावातील एका पाटील शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील निवृत्ती पाटील एक कर्तबगार शेतकरी होते. आमदार पी. एन. पाटील यांच्यावर बालपणी आदर्श संस्काराची जडण झाली. गावातील प्राथमिक शाळेत शिक्षणाचे धडे गिरवत असताना स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांच्या विचारांचा पगडा त्यांच्या मनावर पडला. शालेय जीवनात महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्या विचाराने ते प्रेरित झाले.
शेती व्यवसाय सांभाळत डोझर व्यवसायाकडे वळले. माजी कृषिराज्यमंत्री कै. श्रीपतराव बोंद्रे यांच्या आदर्श विचारातून जिल्हा मध्यवती बँकेच्या संचालकपदी रुजू होताच आपल्या राजकीय चळवळीचा प्रवास पी. एन. पाटील यांनी सुरू केला. जिल्हा बँकेच्या माध्यमातून स्वच्छ कारभार करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. सहकारी चळवळीतून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास आणि ग्रामीण भागात विकासगंगा उभी केली, राजीवजी सूतगिरण, निवृत्ती खरेदी-विक्री सहकारी संघ, भाजीपाला उत्पादक संघ, श्रीपतराव बोंद्रे बँक, अशा विविध सहकारी संस्था उभारून सामान्य जनतेला न्याय मिळून दिला.
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय कुरुक्षेत्रावरील जिल्हा बँक, गोकुळ दूध संघ, करवीर पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून सामान्य माणसाला विकासाच्या प्रक्रियेत सहभागी केले. पी. एन. पाटील यांच्या पुढाकाराने ग्रामीण भागात काँग्रेस विचार तळागाळापर्यंत पोहोचविले. काँग्रेस पक्षाला उभारणी दिली. त्याची दखल काँग्रेस नेत्यांनी घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्षपदही प्राप्त झाले.
आ. पी. एन. पाटील यांची काँग्रेस निष्ठाही आदर्शवादी आहे. काँग्रेस विचारधारा कशी जनमानसात रुजू होईल याचा त्यांना ध्यास होता. तळागाळातील सामान्य कार्यकर्त्यांना पी. एन. पाटील यांनी बळ दिले. त्यांचा राजकीय कालखंड हा पुरोगामी चळवळीला बळ देणारा आहे. माजी पंतप्रधान कै. राजीव गांधी, सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पी. एन. पाटील यांचा जिव्हाळा आहे .
विधानसभेच्या माध्यमातून गावागावांत विकासकामांना प्राधान्य देत आहेत. शेतीचा पाणीप्रश्न, डोंगरी भागातील पिण्याचा पाणीप्रश्न, रस्ते दुरुस्ती, शाळा इमारत, दवाखाने उभारणे, यासारख्या विकासकामांना त्यांनी प्राधान्य दिले. तळागाळापर्यंत विकास हा त्यांचा खरा बाणा आहे. फोन करून अधिकाऱ्यांकडून कामे करून घेण्याचा त्यांचा स्वभाव आहे .
शेतकरी कर्जमुक्त, सातबारा कोरा झाला पाहिजे, शेतीपंपांना वीज मिळाली पाहिजे, दूध धंद्यातून शेतकऱ्यांची उन्नती कशी होईल, या न्याय मागण्यांबाबत सतत शासन दरबारी पी. एन. पाटील यांनी आवाज उठविला. राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रात त्यांचे कार्य हे नव्या पिढीसमोर आदर्श आहे. पी. एन. पाटील यांनी अनेक संकटांना समोरे जात सारं आयुष्य जनतेसाठी वेचले.
करवीर विधानसभा मतदारसंघातील जनतेला नव्या बदलत्या काळात विकासात्मक वैभव प्राप्त करण्याकडे त्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यांनी डोंगरी भागाच्या विकासाला बळ दिले. त्यांना वाढदिनी दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना.
शब्दांकन . = शिवराज लोंढे, सावरवाडी
फोटो . = आमदार पी. एन. पाटील