Kolhapur: मालकाप्रती निष्ठा! पी. एन. पाटील यांच्यानंतर 'ब्रुनो'नेही सोडले प्राण
By पोपट केशव पवार | Updated: May 29, 2024 19:20 IST2024-05-29T19:17:42+5:302024-05-29T19:20:15+5:30
कोल्हापूर : आमदार पी. एन. पाटील यांच्यावर कार्यकर्तेच जिवापाड प्रेम करत होते असे नाही, तर मुक्या प्राण्यांनाही त्यांचा लळा ...

Kolhapur: मालकाप्रती निष्ठा! पी. एन. पाटील यांच्यानंतर 'ब्रुनो'नेही सोडले प्राण
कोल्हापूर : आमदार पी. एन. पाटील यांच्यावर कार्यकर्तेच जिवापाड प्रेम करत होते असे नाही, तर मुक्या प्राण्यांनाही त्यांचा लळा होता. याचेच प्रत्यंतर आमदार पाटील यांच्या निधनानंतर काल, मंगळवारी रात्री आले. पाटील यांच्या निधनानंतर अन्न पाणी सोडलेल्या त्यांच्या 'ब्रूनो' या श्वानानेही दहा दिवसांतच प्राण सोडला.
आयुष्यभर एकाच पक्षाची निष्ठा ठेवणाऱ्या पी. एन. यांच्या श्वानानेही आपल्या मालकाप्रति कशी निष्ठा वाहिली याची अनुभूती यानिमित्ताने आली. १९ मे ला आमदार पाटील हे घरीच बाथरूममध्ये कोसळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
आपला मालक घरी दिसत नसल्याने ब्रूनोही अस्वस्थ झाला. त्याने अन्नपाणी सोडले. त्याची अवस्था पाहून त्याला सलाईन लावण्यात आले. त्याच्यावर औषधोपचार करण्यात आले. पण दहा दिवसांपासून मालकाचा चेहरा नजरेस पडत नसल्याने ब्रूनो'ने अखेर प्राण सोडला.