आमदार पडळकर व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी हाकला औत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:20 AM2020-12-26T04:20:34+5:302020-12-26T04:20:34+5:30
कबनूर : येथील शेतात चालू असलेला औत पाहून आमदार गोपीचंद पडळकर व माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत याना शेती ...
कबनूर : येथील शेतात चालू असलेला औत पाहून आमदार गोपीचंद पडळकर व माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत याना शेती कामाचा मोह आवरता आला नाही. त्यांनी शेतात औत हाकून आपण शेतकरी कुटुंबातील आहोत, शेतीकाम हे आपल्याला नवीन नाही, याची प्रचिती दिली.
कृषी विधेयकाच्या समर्थनात किसान आत्मनिर्धार यात्रेनिमित्त आमदार पडळकर व माजी कृषीमंत्री खोत आले असता, येथील शिवनंदी सांस्कृतिक भवननजीक शेतकरी अनिल माळी हे शेतामध्ये औत हाकत होते. ते पाहून आमदार पडळकर व माजी कृषीमंत्री खोत यांना ते शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे औत हाकण्याचा मोह झाला. त्यांनी शेतकऱ्यांकडून औत घेतला व सुमारे अर्धा तास औत हाकण्याचे काम केले. आपणही शेतकरी कुटुंबातील आहोत. आपल्यासमोर एक शेतकरी शेतामध्ये औत करताना पाहून आठवणींना उजाळा मिळाला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, सुधीर पाटील, अनिल डाळ्या, बी. डी. पाटील, हिंमत जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
(फोटो ओळी)
२५१२२०२०-आयसीएच-०१
कबनूर (ता. हातकणंगले) येथील शेतामध्ये औत हाकताना आमदार गोपीचंद पडळकर व माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत.