Gram Panchayat Result: राधानगरीत आबिटकर, सतेज पाटील, अजित पवार, उद्धव ठाकरे गटाची बाजी, काही गावात स्थानिक आघाड्यांचे वर्चस्व
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 03:58 PM2023-11-06T15:58:48+5:302023-11-06T15:59:11+5:30
गौरव सांगावकर राधानगरी : तालुक्यातील १२ ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ९ ग्रामपंचायतीमध्ये काही गावात नेत्यांनी ...
गौरव सांगावकर
राधानगरी : तालुक्यातील १२ ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ९ ग्रामपंचायतीमध्ये काही गावात नेत्यांनी सत्ता राखली, तर काही ठिकाणी सत्तांतर झाले. यामध्ये आबिटकर गट, सतेज पाटील गट, अजित पवार गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने बाजी मारली. काही गावात स्थानिक आघाड्यांचे वर्चस्व दिसून आले.
तालुक्यातील लक्षवेधी ठरलेल्या सरवडेमध्ये विरोधी समविचारी आघाडीचा पराभव करीत बिद्रीचे उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, संचालक राजेंद्र पाटील व गोकुळचे संचालक आर.के.मोरे या नेत्यांच्या सताधारी आघाडीचे रणधिर विजयसिंह मोरे हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. तर फराळे येथे सतेज पाटील गटाच्या सरपंच पदाच्या वैशाली संदीप डवर यांनी बाजी मारली.
न्यू करंजे राजश्री शाहू आघाडीचे सरपंच सद्दाम शिराज तांबोळी तर फेजीवडे मध्ये प्रतिभा भरत कासार यांनी सरपंच पदासह सत्ता काबीज केली. बारडवाडीत सत्तांतर करीत आबिटकर गटाचे वसंत पाटील विजयी झाले. पालकरवाडी अजित पवार गटाचे महेश नामदेवराव भोईटे. चांदेकरवाडीत मनसे व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सीमा हिंदुरावा खोत यांनी सत्ता परिवर्तन केले. कसबा वाळवे सरपंच वनिता भरत पाटील. मांगेवाडी प्रवीण नामदेव ढवन, तर पोट निवडणुकीत कोदवडे दीपाली रामचंद्र वाडकर, म्हासुर्ली ग्रामपंचायत पोटनिवडणूक विरोधी आघाडीचे सदस्य पदाचे उमेदवार अक्षय चौगले विजयी झाले.