इचलकरंजीतून विधानसभेसाठी राहुल आवाडे रिंगणात, आमदार प्रकाश आवाडे यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 12:34 PM2024-08-15T12:34:49+5:302024-08-15T12:38:16+5:30

...तसेच इचलकरंजीसह तीन विधानसभा क्षेत्रात ताराराणी पक्षातर्फे उमेदवार उभे करण्याचीही घोषणाही केली.

MLA Prakash Awade announced that Rahul Awade contests for Assembly from Ichalkaranji  | इचलकरंजीतून विधानसभेसाठी राहुल आवाडे रिंगणात, आमदार प्रकाश आवाडे यांची घोषणा

इचलकरंजीतून विधानसभेसाठी राहुल आवाडे रिंगणात, आमदार प्रकाश आवाडे यांची घोषणा



इचलकरंजी : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून  निवडणुकीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे हे उमेदवार असतील, अशी घोषणा आमदार प्रकाश आवाडे यांनी गुरुवारी इचलकरंजी ताराराणी पक्ष कार्यालयात केली. तसेच इचलकरंजीसह तीन विधानसभा क्षेत्रात ताराराणी पक्षातर्फे उमेदवार उभे करण्याचीही घोषणाही केली.

        तसेच उमेदवारीसाठी कोणाकडे जाणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. महायुतीकडून सन्मानाने उमेदवारी मिळाल्यास ती स्वीकारली जाईल. जिथून आलो तिथे परत जाणार नाही, असे सांगत त्यांनी काँग्रेसमध्ये परतण्याच्या चर्चेलाही पूर्ण विराम दिला आहे. महायुती मधील भाजप शिवसेना शिंदे गट अथवा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी स्वीकारण्याची तयारी असल्याचे आवाडे यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: MLA Prakash Awade announced that Rahul Awade contests for Assembly from Ichalkaranji 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.