शहाजीबापू ट्रॅफिकमध्ये अडकले, 'एकदम ओक्के' म्हणत वाहनधारकांनी डिवचले!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 03:53 PM2022-10-15T15:53:35+5:302022-10-15T17:24:26+5:30
शहाजी बापू यांचा ताफा ट्रॅफिकमध्ये अडकल्याने हातकणंगले परिसरातील वाहनधारक आणि नागरिकानी त्यांच्यासमोर एकच गर्दी केली.
हातकणंगले : काय ती झाडी…काय त्यो डोंगार, ओक्केच म्हणारे आमदार शहाजी बापू पाटील कोल्हापूर-सांगली मार्गावर हातकणंगले जवळ चक्क वाहतूक कोंडीत अडकले. यावेळी आमदार शहाजीबापू दिसताच वाहनधारकांनी त्यांना उद्देशून काय तो सांगली- कोल्हापूर रस्ता, काय ते खड्डे, आणि काय ते ट्रॅफिक एकदम ओक्के असे म्हणत संताप व्यक्त केला.
कोल्हापूर -सांगली मार्गावरील खडयेमय रस्त्याच्या वाहतूक कोंडीत हातकणंगले जवळ आमदार शहाजी बापू पाटील अडकले. अर्धा तास त्यांचा ताफा वाहतूक कोंडीत अडकला. त्यांच्या गाड्यांचा ताफा पुढे सरकत नसल्याने त्यांनी गाडीतच डुलकी घेतली. यावेळी वाहनधारकानी त्यांना उद्देशून काय तो सांगली- कोल्हापूर रस्ता, काय ते खड्डे, आणि काय ते ट्रॅफिक एकदम ओक्के असा संताप व्यक्त केला.
कोल्हापूर-सांगली राज्य मार्ग आहे की शेतीचा पाणंद रस्ता अशी स्थिती या मार्गाची झाली आहे. शिंदे गटाचे आ. शहाजी बापूंपाटील हे सांगली कडुन कोल्हापूरकडे येत असताना हातकणंगले बसस्टँड जवळ पडलेल्या रस्त्यावरील खडयामध्ये जाम झालेल्या ट्रॅफिकमध्ये अडकले. शहाजी बापू यांचा ताफा ट्रॅफिकमध्ये अडकल्याने हातकणंगले परिसरातील वाहनधारक आणि नागरिकानी त्यांच्यासमोर एकच गर्दी केली. त्यांच्या सुरक्षा रक्षकाला ट्रफीक मधून मार्ग काढत त्यांना पुढे वाट करून दयायची वेळ आली. यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.