Agricultural electricity issue:..तर आमदारांना गावात येऊ देणार नाही, राजू शेट्टी यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 04:53 PM2022-02-28T16:53:26+5:302022-02-28T17:23:39+5:30
..तर बारामती येथे आंदोलन करण्याचे विसरलो नाही असा इशाराही त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव घेवून दिला.
समीर देशपांडे
कोल्हापूर : शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याबाबत जर शुक्रवार पर्यंत निर्णय झाला नाही तर आमदारांना गावात येऊ देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.
याबाबत लवकर निर्णय नाही झाला तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय आज, सोमवारी शेट्टी यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेतला. जर या अधिवेशनात ५० हजार रुपये अनुदान देण्याबाबत तरतूद झाली नाही तर बारामती येथे आंदोलन करण्याचे विसरलो नाही असा इशाराही त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव घेवून दिला.
कोल्हापुरात महावितरण कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी गेल्या सहा दिवसांपासून बेमुदत आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने संतप्त अज्ञात शेतकऱ्यांनी गुरुवारी (दि.२४) कागल येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय पेटवले होते. तर काल, रविवारी रात्री सांगली जिल्ह्यातील कसबा डिग्रज येथील महावितरणचे कार्यालय पेटवण्यात आले. यामुळे याप्रश्नी वेळीच निर्णय झाला नाही तर हे आंदोलन चिघळण्याची दाट शक्यता आहे.