‘मनरेगा’ रोजगार निर्मितीसाठी महत्त्वाची : नीता शिंदे
By admin | Published: March 20, 2015 11:40 PM2015-03-20T23:40:09+5:302015-03-20T23:40:26+5:30
जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अल्पबचत भवन येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसंदर्भातील पत्रकारांच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या.
रत्नागिरी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही रोजगार निर्मितीसाठी महत्त्वाची ठरली असून, त्या माध्यमातून जिल्ह्यातील विकासकामे पूर्ण होऊन विकासाला चालना मिळत आहे, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी नीता शिंंदे यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अल्पबचत भवन येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसंदर्भातील पत्रकारांच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सीद, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय कृषी विभागाचे तांत्रिक अधिकारी तरूण वैती यांच्यासह विविध प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शिंंदे यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फळबाग लागवड केली जात आहे. यामुळे फळबागांचे क्षेत्र वाढून बागायतदारांना फायदा मिळत आहे. तसेच योजनेअंतर्गत घेण्यात येणाऱ्या सिंंचन विहिरींच्या कामांमुळे पिण्यासाठी आणि सिंंचनासाठी पाणी उपलब्ध होत असल्याचे सांगितले. या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या जॉबकार्डधारकांना त्यांचे वेतन वेळेत उपलब्ध करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक फंड मॅनेजमेंट सिस्टीम (इएफएमएस) हे महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. याद्वारे जॉबकार्डधारकांचे वेतन हे थेट त्यांच्या बँकेतील खात्यात जमा करण्यात येत असल्याने वेतन मिळण्यासाठीचा विलंब कमी झाला आहे, असे त्या म्हणाल्या.सीद यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा परिचय करुन दिला. ते म्हणाले, योजनेच्या अंमलबजावणीत ग्रामसभेच्या रुपाने थेट ग्रामस्थांचा सहभाग असतो. गावपातळीवरील गरजेनुसार ग्रामस्थ कामांची निवड करत असल्याने गावासाठीची महत्त्वाची विकासकामे साध्य होत आहेत. या माध्यमातून गावाचा पर्यायाने जिल्ह्याचा विकास होतो आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांच्या समन्वयातून जिल्हाभरात ही योजना प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अतिशय पारदर्शक अशी ही योजना असल्याचे त्यांनी सांगितले. एकात्मिक व प्रमुख कायदेशीर बाबी, योजनेची वैशिष्ट्ये, कामाचे स्वरूप, मजुरीचे वाटप, विलंबाचा आकार, बेरोजगार भत्ता तसेच ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांची भूमिका विशद केली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कृषी विभागाकडून करण्यात येणाऱ्या कामांची माहिती त्यांनी दिली. यावेळी मार्गदर्शकांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या शंकांचे निरसन केले. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात एकूण १,१३,८८४ जॉबकार्डधारक असून, त्यापैकी ३५,००० मजूर नियमित असल्याची माहिती रोहयो विभागाच्या उपजिल्हाधिकारी नीता शिंदे यांनी दिली. मजुरांची सर्व प्रकारची माहिती, तसेच चालू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या कामांची माहिती, त्यांचे वेतन आदी पूर्ण माहिती ६६६.ेॅल्ल१ीँ.ल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यामुळे या योजनेचा दैनंदिन अहवाल या संकेतस्थळावर पाहात येऊ शकेल, असेही त्या म्हणाल्या.