भेडसगाव ग्रामपंचायतीने बनविले मोबाईल ॲप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:25 AM2021-04-01T04:25:31+5:302021-04-01T04:25:31+5:30

या मोबाईल ॲपमध्ये गावाविषयीची सविस्तर माहितीसह पदाधिकारी , प्रतिनिधी , कृषि, विज्ञान, बाजारभाव, ई - दवंडी, बातम्या, विकासकामे, मार्केट, ...

Mobile app developed by Bhedasgaon Gram Panchayat | भेडसगाव ग्रामपंचायतीने बनविले मोबाईल ॲप

भेडसगाव ग्रामपंचायतीने बनविले मोबाईल ॲप

googlenewsNext

या मोबाईल ॲपमध्ये गावाविषयीची सविस्तर माहितीसह पदाधिकारी , प्रतिनिधी , कृषि, विज्ञान, बाजारभाव, ई - दवंडी, बातम्या, विकासकामे, मार्केट, आरोग्य, शिक्षण, नोकरीविषय महत्त्वाचे संपर्क, उद्योग, सेवा, योजना , ग्रामपंचायत प्रशासन, विषय समित्या, ग्रा. पं. करासह विविध विषयांची माहिती देण्यात आली आहे. ग्रामस्थांना एका क्लिकवर या ॲपच्या माध्यमातून वरील सर्व माहिती मिळणार आहे.

सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी नोकरीविषयक माहिती, शेतकऱ्यांसह व्यावसायिकांना या ॲपच्या माध्यमातून विक्रीसाठी दालन उपलब्ध झाले आहे.

ग्रामस्थांच्या सोयीसाठी हे ॲप सुरू करण्यात आले असल्याची माहिती सरपंच अमरसिंह पाटील यांनी दिली. यावेळी उपसरपंच दाजी पाटील, ग्रामविकास अधिकारी सुभाष पाटील आदी सह सर्व ग्रा. पं. सदस्य उपस्थित होते .

Web Title: Mobile app developed by Bhedasgaon Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.