दुर्गम वाड्यावस्त्यांवरील ७५ विद्यार्थ्यांना देणार मोबाइल भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:28 AM2021-08-13T04:28:05+5:302021-08-13T04:28:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मोबाइलअभावी ज्यांचे शिक्षण थांबले आहे, अशा दुर्गम वाड्यावस्त्यावरील किमान ७५ विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त ...

Mobile gift to 75 students from remote villages | दुर्गम वाड्यावस्त्यांवरील ७५ विद्यार्थ्यांना देणार मोबाइल भेट

दुर्गम वाड्यावस्त्यांवरील ७५ विद्यार्थ्यांना देणार मोबाइल भेट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : मोबाइलअभावी ज्यांचे शिक्षण थांबले आहे, अशा दुर्गम वाड्यावस्त्यावरील किमान ७५ विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त मोबाइल भेट देण्याचा उपक्रम कोल्हापुरात सुरू झाला आहे. ज्यांची ऐपत आहे, अशा पालकांनी किमान ५ हजार रुपयांच्या एका मोबाइलची जबाबदारी घ्यायची आहे. त्यासाठी आवाहन करण्यात आले असून लोकांकडून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या मोहिमेची मूळ सुरुवात ‘लोकमत’मधील वृत्तमालिकेतून झाली आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनीलकुमार लवटे यांची ऑनलाइन शिक्षणातील अडचणींसंबंधीची ही दोन भागांची वृत्तमालिका १८ व १९ जून २०२१ ला राज्यभर प्रसिद्ध झाली. त्यामुळे दुर्गम भागात इंटरनेटच्या सुविधेचा अभाव, गोरगरीब पालकांना मोबाइल घेणे परवडत नसल्याने मुलांच्या शिक्षणात अडचणी येत असल्याचे म्हटले होते. त्यातून मार्ग म्हणून काही ठिकाणी गोरगरीब हुशार मुलांना शिक्षणासाठी आवश्यक असलेला मोबाइल उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली. कोल्हापुरात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून किमान ७५ विद्यार्थ्यांना हे मोबाइल देण्यात येणार आहेत. यंदा स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सवी प्रारंभ आहे. कोरोनामुळे अगोदरच ज्यांच्या कौटुंबिक अडचणी वाढवल्या होत्या, त्यात महापुराचा फटका बसला, अशा पालकांच्या मुलांना मुख्यत: हे मोबाइल दिले जाणार आहेत. पन्हाळा येथील बालग्रामची मुले, सांगली अनाथाश्रमातील मुलांसह दुर्गम खेड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांना हे मोबाइल दिले जाणार आहेत. मुलांची निवड शिक्षकच करणार आहेत. रेडिओ सिटीचेही या उपक्रमास पाठबळ आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी त्यामध्ये सहभागी व्हावे व जेवढे दानशूर लोक वाढतील, तेवढ्या जास्त मुलांना मोबाइल मिळू शकतील.

असाही एक प्रयत्न...

वसंतराव चौगले इंग्लिश मीडियम स्कूलच्या दहावीतील ९० विद्यार्थ्यांना शाळेतर्फेच अभ्यासात अडचण होऊ नये म्हणून टॅब देण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी सांगितले. शैक्षणिक शुल्कातही सवलत दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Mobile gift to 75 students from remote villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.