पोस्टासह बँकांतून आधार कार्डला मोबाईल लिंक करून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:19 AM2021-05-29T04:19:07+5:302021-05-29T04:19:07+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील परवानाधारक रिक्षाचालकांना राज्य शासनाने कोरोनाकाळात १५०० रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. मात्र, त्याकरिता आधार कार्ड क्रमांकाला ...
कोल्हापूर : जिल्ह्यातील परवानाधारक रिक्षाचालकांना राज्य शासनाने कोरोनाकाळात १५०० रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. मात्र, त्याकरिता आधार कार्ड क्रमांकाला मोबाईल लिंक करण्याची अट घातली आहे. त्यामुळे पोस्टासह सरकारी बँकांतून करून द्यावे, अशी मागणी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघातर्फे शुक्रवारी केली.
या अनुदानासाठी जिल्ह्यातील १५ हजार २८७ रिक्षाचालकांना आधार कार्ड क्रमांकाला मोबाईल क्रमांक लिंक करण्यास सांगितले आहे. मात्र, महा ई सेवा केंद्रातून मनमानी पद्धतीने शुल्क आकारले जात आहे. ते रिक्षाचालकांना परवडणारे नाही. त्यामुळे सरकारनेच पुढाकार घेऊन सरकारी बँका व पोस्टामध्ये ही सुविधा अल्प शुल्कात करुन द्यावी. अशी मागणी या निवेदनात केली आहे. या वेळी चंद्रकांत भोसले, राजेंद्र जाधव, विजय गायकवाड, वसंत पाटील, इंद्रजित शिंदे, प्रथमेश भोसले, रितेश जाधव उपस्थित होते.