आसुर्ले-पोर्ले परिसरात मोबाईल नेटवर्क विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:22 AM2021-04-12T04:22:41+5:302021-04-12T04:22:41+5:30

पोर्ले तर्फ ठाणे : गेल्या आठवड्यापासून आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) परिसरात मोबाईल नेटवर्क विस्कळीतपणामुळे ग्राहकांना विकतच्या मनस्तापाला सामोरे जावे लागत ...

Mobile network disrupted in Asurle-Porle area | आसुर्ले-पोर्ले परिसरात मोबाईल नेटवर्क विस्कळीत

आसुर्ले-पोर्ले परिसरात मोबाईल नेटवर्क विस्कळीत

googlenewsNext

पोर्ले तर्फ ठाणे : गेल्या आठवड्यापासून आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) परिसरात मोबाईल नेटवर्क विस्कळीतपणामुळे ग्राहकांना विकतच्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. विशेषत: आयडीया-व्होडाफोन कंपनीच्या मोबाईल सेवेत विस्कळीतपणा जास्त असल्याने ग्राहकांतून कंपनीच्या सेवेबाबत संताप व्यक्त होत आहे.

आयडीया-व्होडाफोनचे गेल्या दोन वर्षापासून ग्राहकांना नेटवर्क सुरळीत करणार असल्याचे एसएमएसद्वारे गाजर दाखवले जात आहे. या परिसरात असणाऱ्या कंपनीच्या मुख्य वितरकांकडून समर्पक उत्तर दिले जात नाही. त्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.

मोबाईल सुविधेमुळे अनेक कामे सोपी झाल्यामुळे, मोबाईलशिवाय कामकाज पुढे जातच नाही. शिवाय अनेक मिटिंगा, ॲानलाईन शिक्षणप्रणाली यामुळे मोबाईल नेटवर्क सुविधा गरजेची बनली आहे. अशावेळी मोबाईल सेवा देणाऱ्या कंपनीच्याच नेटवर्कमध्ये विस्कळीतपणा आल्यामुळे ग्राहकांना विनाकारण मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. यातून फोन लागलाच, तर मध्येच बंद होणे, आवाजातील विस्कळीतपणा, तास-तासभर फोन न लागणे, फोन नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर असणे, या प्रमुख कारणांसह मोबाईल सुविधांच्या विस्कळीतपणामुळे ग्राहक संताप व्यक्त करत आहेत. नेटवर्क समस्येमुळे कंपनी अदलाबदलीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे, याकडे कंपन्यांनी दुर्लक्ष करू नये.

टीप-सोबत मोबाईलचा फोटो वापरावा

Web Title: Mobile network disrupted in Asurle-Porle area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.