‘सावित्रीबाई फुले’मध्ये मॉकड्रील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:27 AM2021-01-19T04:27:09+5:302021-01-19T04:27:09+5:30
कोल्हापूर : गोखले कॉलेज येथील सावित्रीबाई फुले रुग्णालय येथे सोमवारी अग्निशमन विभागाकडून शोध व बचावाची प्रात्यक्षिके घेण्यात आली. भंडारा ...
कोल्हापूर : गोखले कॉलेज येथील सावित्रीबाई फुले रुग्णालय येथे सोमवारी अग्निशमन विभागाकडून शोध व बचावाची प्रात्यक्षिके घेण्यात आली. भंडारा येथे बाल विभागात झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ही प्रात्यक्षिके घेतल्याचे समजते.
यावेळी रुग्णालयात आपत्कालिन घटना घडल्यास कशाप्रकारे बचाव करावा, याबाबत रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, नागरिकांना प्रत्यक्ष घटना घडल्याचे भासवून प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी रोप रेस्क्यू, लॅडर रेस्क्यू करुन आगीच्या ठिकाणी अडकलेल्या लोकांना वाचविण्याची व आग विझविण्याची प्रात्यक्षिके झाली. टीम तयार करुन घटना घडल्यास कोणी, कोणत्याप्रकारे, कसे काम करायचे, याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले. महापालिकेचे अग्निशमन दल रुग्णालयात आल्याने परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, प्रात्याक्षिक सुरु असल्याचे समजताच त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
फोटो : १८०१२०२१ केएमसी अग्निशमक न्यूज १
फोटो : १८०१२०२१ केएमसी अग्निशमक न्यूज २
ओळी : कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले रुग्णालय येथे सोमवारी महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून शोध व बचावाची प्रात्यक्षिके घेण्यात आली. आगीच्या ठिकाणी अडकलेल्या लोकांना वाचविणे, आग विझविण्याबाबत माहिती देण्यात आली.