‘मॉडर्न होमिओपॅथी’च्या औषधोपचाराने मिळाले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:23 AM2021-04-02T04:23:14+5:302021-04-02T04:23:14+5:30
लिव्हर सोरॅसिसने त्रस्त झालो होतो. त्यातून मला बरे करण्याचे काम मॉडर्नने केले. मला एक प्रकारे जीवदान मिळाले. त्याबद्दल मॉडर्नच्या ...
लिव्हर सोरॅसिसने त्रस्त झालो होतो. त्यातून मला बरे करण्याचे काम मॉडर्नने केले. मला एक प्रकारे जीवदान मिळाले. त्याबद्दल मॉडर्नच्या सर्व डॉक्टरांचे आभार मानतो, असे कोरेगाव येथील फिरोज शेख यांनी सांगितले. ॲलोपॅथीमधील उपचार घेताना माझे पती फिरोज यांच्याबाबत लिव्हर ट्रान्सप्लांटचा सल्ला दिला होता. मग, आम्हाला मॉडर्नची माहिती मिळाली आणि आम्ही येथील उपचार पद्धती सुरू केली. त्यामुळे पती बरे झाले असल्याचे आयशा शेख यांनी सांगितले. मलादेखील लिव्हर सोरॅसिसचा त्रास झाला. दोन महिन्यांत लिव्हर बदलावे लागणार होते. त्यावर डिसेंबरपासून मॉडर्नमधून औषधोपचार सुरू केले. तब्येत सुधारली असल्याचे कऱ्हाडमधील अमोल जाधव यांनी सांगितले. कोरोनाच्या रुग्णांवरही मॉडर्नने उपचार केले असल्याचे डॉ. तेजस्विनी चिंचवाडे यांनी सांगितले. यावेळी डॉ. सीताराम भिंगारे उपस्थित होते.
चौकट
जुनाट आजारांवर यशस्वी उपचार
हृदयरोग, मेंदूविकार, नेफ्रोटिक, सिंड्रोम, एनिमिया, थायरॉईड, गर्भाशयाच्या गाठी, आदींबाबत जुनाट आजारांवर यशस्वी उपचार केले आहेत. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात, तेलंगणा या राज्यांसह २६ शहरांमध्ये मॉडर्न कार्यरत आहे. अमेरिका, युनायटेड किंग्डम, अरब देशांमध्ये ऑनलाईन सेवा उपलब्ध असल्याची माहिती डॉ. पाटील यांनी दिली.