फसवणूक करणारे मोदी सरकार हटवा : राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 01:51 AM2018-06-05T01:51:15+5:302018-06-05T01:51:15+5:30
मालगाव (ता. मिरज) : खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे.
मालगाव (ता. मिरज) : खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. सात-बारा कोरा करण्याचे केवळ आश्वासन देणाºया व स्वामिनाथन् आयोगाच्या शिफारशी लागू न करणाºया मोदी सरकारला सत्तेवरून हटविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी केले. शेतकºयांच्या प्रश्नावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविण्याचीही मागणी केली.
मालगाव येथे स्वाभिमानी विद्यार्थी व वाहतूक संघटनेच्या शाखा उद्घाटनानिमित्त आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. जिल्हाध्यक्ष महेश खराडे यावेळी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, देशात भाजपची सत्ता येण्यापूर्वी पंतप्र्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकºयांच्या शेतजमिनीवर असलेला कर्जाचा बोजा कमी करून सात-बारा कोरा करण्याबरोबरच शेतीमालाला हमीभाव मिळवून देण्याची आश्वासने दिली होती. मात्र सत्ता मिळताच मोदी सरकाने शेतकºयांना वाºयावर सोडले.
खा. शेट्टी म्हणाले, सरकारच्या चुकीच्या व दुटप्पी धोरणामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. उत्पादनाला हमीभाव नाही. शेतकºयांना कर्ज देतानाही दुटप्पीपणा सुरू केला आहे. उद्योगपतींना ४० हजार कोटीचे कर्ज विनातारण दिले जाते, मात्र शेतकºयांना दहा हजार रूपयांच्या कर्जासाठी लाखो रूपये किमतीची जमीन तारण ठेवल्याशिवाय कर्ज मिळू शकत नाही. हे अन्यायकारक धोरण बदलण्यासाठी व केवळ शेतकºयांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन घेण्याची मागणी आहे. देशातील २१ संघटनांनी एकत्र येऊन शेतकºयांच्या प्रश्नासाठी संसदेचे एक आठवड्याचे विशेष अधिवेशन बोलाविण्याची मागणी राष्टपतींकडे केली आहे. मोदी सरकारला सत्तेवर आल्यानंतर त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा व शेतकºयांचा विसर पडल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. अशा सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. त्यांना सत्तेवरून हटविण्याची गरज आहे.
शेतकºयांच्या न्यायासाठी लढा सुरू ठेवणार
देशातील उद्योगपती नीरव मोदी, विजय मल्ल्या, ललित मोदी यांनी करोडो रूपयांचे घोटाळे करून देश सोडला. मात्र त्यांच्यावर कारवाई होऊ शकली नाही. उद्योगपतींना दिलेली कोट्यवधीची कर्जे सरकार माफ करते; मात्र सर्वसामान्य शेतकºयांना कर्जमाफी देताना निकष लावले जातात. कर्ज वसुलीसाठी त्यांच्यावर जप्तीची कारवाई केली जाते. सरकारचा हा दुटप्पी अन्याय सहन न होणारा असल्याने आम्ही सरकारच्या धोरणाविरोधात रस्त्यावर उतरून लढा सुरू केला आहे. शेतकºयांच्या न्यायासाठी हा लढा सुरूच ठेवणार असल्याचे खा. राजू शेट्टी यांनी सांगितले.