कोल्हापुरात दिवे पेटवून मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 10:08 PM2020-04-05T22:08:01+5:302020-04-06T10:44:31+5:30
कोरोना विरोधातील लढाईत कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेने ९ मिनिटे वीज बंद ठेवून आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले.
कोल्हापूर : कोरोना विरोधातील लढाईत कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेने ९ मिनिटे वीज बंद ठेवून आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले.
मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत एकजुटीने मोदींच्या कोरोना विरोधातील लढाईच्या निर्धाराला कोल्हापुरातील नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
रविवारी रात्री नऊ वाजताच कोल्हापुरातील नागरिकांनी ठिकठिकाणी, घराघरात मेणबत्त्या, पणत्या, दिवे पेटवून नऊ मिनिटे परिसर प्रकाशमान केला.
सोशल डिस्टन्सचे पालन करून नागरिकानी नागरिकांनी मोकळ्या मैदानात तसेच घरांच्या दारामध्ये, अंगणात, बाल्कनीमध्ये, टेरेसवर दिवे लावल्याने सर्व परिसर उजळून गेला होता.
कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागातील लोकांनी लोकांनी उत्स्फूर्तपणे दिवे लावले. अनेकांनी मशाली पेटवल्या, तर काही ठिकाणी मोबाईलच्या टॉर्चचा प्रकाश पाडून मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.
काही ठिकाणी मेणबत्त्या लावल्या, तर काहींनी टॉर्चच्या प्रकाशात मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. मात्र काही उत्साही मंडळींनी रस्त्यावर येऊन जल्लोष केला. ग्रामीण भागात तसेच शहर परिसरात मोकळ्या मैदानावर भारत मातेच्या प्रतिमेच्या भोवती तसेच भारतमातेच्या रांगोळी भोवती दिवे लावून परिसर प्रकाशमान केला.
शहरातील राजारामपुरी, प्रतिभानगर, उद्योमनगर, शाहूपुरी या परिसरातील पॉवर ग्रिडवर कोणताही परिणाम झाला नाही, असा अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.
गंगावेश परिसरात पैलवानांनी मेणबत्त्या पेटवून मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला तर कागल तालुक्यातील बाणगे येथील रवींद्र पाटील मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भारत मातेच्या रांगोळी भोवती दिवे पेटवले.