सुधारित :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:20 AM2020-12-25T04:20:52+5:302020-12-25T04:20:52+5:30

६ जानेवारीपासून अर्ज दाखल होणार : बिनविरोधसाठी सत्तारूढ गटाचे प्रयत्न लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : वीरशैव को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीचा ...

Modified: | सुधारित :

सुधारित :

Next

६ जानेवारीपासून अर्ज दाखल होणार : बिनविरोधसाठी सत्तारूढ गटाचे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : वीरशैव को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी अमर शिंदे यांनी गुरुवारी जाहीर केला. बँकेसाठी ६ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. मागील निवडणुकीत काही गटातच निवडणूक झाली होती. यावेळेला निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सत्तारूढ गटाचा आहे. ७ फेब्रुवारी रोजी मतदान आणि ९ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

महाराष्ट्र व कर्नाटक कार्यक्षेत्र असलेल्या बहुराज्यीय वीरशैव बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. तीस शाखांच्या माध्यमातून बँकेचा १५०० कोटींचा व्यवहार असून तब्बल ४ कोटी नफा आहे. बँकेची मागील निवडणूक बिनविरोध करण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न झाला. मात्र, १९ जागांसाठी २६ अर्ज राहिल्याने काही गटांसाठी निवडणूक लागली होती. यामध्ये सत्तारूढ गटाने एकतर्फी विजय खेचून आणला होता.

आता निवडणूक होत असून गुरुवारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. मतदार यादीवर ४ जानेवारीपर्यंत हरकती घेता येणार असून ५ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच ६ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे.

बहुराज्यीय संस्था नोंदणी कायद्यांतर्गत एकूण जागेएवढेच अर्ज आले, तर बँकेची सर्वसाधारण सभाच संचालक मंडळास मान्यता देते. बँकेची सर्वसाधारण सभा २५ जानेवारीला आहे. जागेएवढेच अर्ज आले नाहीत, तर ७ फेब्रुवारी रोजी मतदान आणि ९ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

दृष्टिक्षेपात वीरशैव बँक...

कार्यक्षेत्र : महाराष्ट्र, कर्नाटक

शाखा : ३०

सभासद : २२ हजार

ठेवी : ९२७ कोटी

कर्जे : ५७२ कोटी

नफा : ४ कोटी

कोट-

गेली १५ ते २० वर्षे सभासदांनी विश्वास टाकत आमच्यावर जबाबदारी सोपविली. त्यास पात्र राहून अतिशय पारदर्शक कारभार केला. यावेळची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.

- नानासाहेब नष्टे ( ज्येष्ठ संचालक, वीरशैव बँक)

- राजाराम लोंढे

Web Title: Modified:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.