सुधारित : ‘बाजारगेट’मधून डझनभर उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:17 AM2020-12-27T04:17:56+5:302020-12-27T04:17:56+5:30

विनोद सावंत/ लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शहराच्या मध्यवर्ती असणारा बाजारगेट प्रभाग (क्रमांक ३१) खुला झाल्याने येथे डझनभर उमेदवार ...

Modified: Dozens of candidates from 'Bazaargate' | सुधारित : ‘बाजारगेट’मधून डझनभर उमेदवार

सुधारित : ‘बाजारगेट’मधून डझनभर उमेदवार

Next

विनोद सावंत/ लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : शहराच्या मध्यवर्ती असणारा बाजारगेट प्रभाग (क्रमांक ३१) खुला झाल्याने येथे डझनभर उमेदवार रिंगणात असून, काटे की टक्कर होणार आहे. आजी, माजी नगरसेवकांसह तगड्या उमेदवारांमध्ये रस्सीखेच अपेक्षित आहे. शेजारील प्रभाग आरक्षित असल्याने पत्ता कट झालेल्यांच्याही नजरा या प्रभागावर आहेत. विशेष म्हणजे महापालिकाच या प्रभागात आहे. त्यामुळे ‘बाजारगेट’मधून महापालिकेत नगरसेवक म्हणून कोणाला प्रवेश मिळणार, हे औत्सुक्याचे आहे.

बाजारगेट प्रभाग हा अठरापगड जातींतील लोक राहत असणारा प्रभाग आहे. येथे महापालिकेची प्रत्येक निवडणूक चुरशीने होते. हा प्रभाग शिवसेनेचा बालेकिल्ला होता. दिवंगत नंदकुमार गजगेश्वर यांचे या प्रभागावर वर्चस्व होते. १९९०, २००० आणि २००५ असा सलग तीनवेळा त्यांचा विजय झाला. महापालिकेच्या सभागृहात शिवसेनेचे पहिले सहा नगरसेवक होते. त्यामध्ये गजगेश्वर यांचा समावेश होता.

गतवर्षीच्या निवडणुकीमध्ये हा प्रभाग ‘इतर मागासवर्गीय महिला’ या प्रवर्गासाठी आरक्षित होता. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली. काँग्रेसच्या उमा बनछोडे येथून विजयी झाल्या. बनसोडे, राष्ट्रवादीच्या सुवर्णा सांगावकर आणि शिवसेनेच्या शशिकला गजगेश्वर यांच्यामध्ये चुरस झाली. आगामी निवडणुकीसाठी हा प्रभाग सर्वसाधारण झाल्याने चुरस आणखी वाढली आहे. इच्छुकांनी आतापासून फिल्डिंग लावली असून, येथील निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यता आहे. ऐनवेळी या प्रभागातून शिवसेनेचा तगडा उमेदवार देण्याच्याही हालचाली आहेत. विद्यमान नगरसेविका उमा बनछोडे पुन्हा रिंगणात उतरणार आहेत, तर शेजारील प्रभाग आरक्षित झाल्यामुळे ईश्वर परमार यांच्याही नावाची चर्चा आहे. याचबरोबर माजी नगरसेवक निशिकांत मेथे, विजय सरदार यांनीही कंबर कसली आहे. बजापराव माजगावकर तालीम परिसरातून नितीन ब्रम्हपुरे यांच्या नावाची चर्चा आहे. याचबरोबर दिवंगत नंदकुमार गजगेश्वर यांचे चिरंजीव अभिजित गजगेश्वर हे मागील निवडणुकीतील वचपा काढण्यासाठी जिवाची बाजी लावत आहेत. अभिजित सागावकर, दीपक येसार्डेकर, भरत काळे यांच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे.

चौकट

गत निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते

उमा बनछोडे (काँग्रेस) १८६०

सुवर्णा सागावकर (राष्ट्रवादी) १५७४

शशिकला गजगेश्वर (शिवसेना) ११३८

प्रणाली मोतीपुरे (ताराराणी आघाडी) ३५५

प्रभागातील समस्या

अमृत योजनेतून पाईपलाईन टाकल्यानंतर रस्ते केले नसल्यामुळे खड्ड्यांचे साम्राज्य

जोशी गल्ली परिसरातील स्वच्छतागृहाची दुरवस्था

ऋणमुक्तेश्वर मंदिर परिसरात नवीन पिण्याची पाईपलाईन टाकण्यास चालढकलपणा

जोशी गल्ली ते कुंभार गल्ली येथील रस्ता खराब

आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष

प्रभागात मुदतीपूर्वीच रस्ते खराब

शाहू उद्यानाकडे दुर्लक्ष

पाण्याची समस्या

चौकट

प्रभागातील सोडविलेले नागरी प्रश्न

पापाची तिकटी येथे एक कोटी २५ लाखांतून छत्रपती संभाजी महाराज, महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण

बहुतांश परिसरातील ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण

प्रभागातील ३५ वर्षांतील पाण्याचा प्रश्न मार्गी, अमृत योजनेतून नवीन पाईपलाईन

महापालिका परिसरात पेव्हर पद्धतीने रस्ते

लोणार चौक ते डोर्ले कॉर्नर रस्त्यासाठी ३५ लाखांचा निधी मंजूर

बजाप माजगावकर तालीम ते शाहू उद्यान रस्ता

पापाची तिकटी ते गंगावेश रस्ता

संपूर्ण प्रभागात एलईडी लाईट

कोंडाळामुक्त प्रभाग

प्रतिक्रिया

गेल्या पाच वर्षांमध्ये सुमारे तीन कोटींची विकासकामे केली आहेत. अमृत योजनेतून पिण्याची पाईपलाईन टाकल्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटला. ९० टक्के ड्रेनेज लाईनची कामे झाली आहेत. या कामांसाठी खुदाई केलेले रस्ते लवकरच होणार आहेत. ऋणमुक्तेेश्वर मंदिर परिसरात ड्रेनेज लाईनचे काम झाले आहे. रस्त्यासाठीचा निधी मंजूर असून, लवकरच काम सुरू होईल. पुन्हा संधी मिळाल्यास संपूर्ण प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, दोन ते तीन गल्ल्यांमधील पाईपलाईनची कामे बाकी आहेत, ती पूर्ण करण्याचा मानस आहे.

- उमा बनछोडे, नगरसेविका

फोटो : २६१२२०२० कोल केएमसी बाजारगेट प्रभाग

ओळी : कोल्हापुरातील बाजारगेटमध्ये पापाची तिकटी ते जोशी गल्ली चौक येथे अमृत योजनेतून पाईपलाईन टाकली आहे. मात्र, रस्ता केला नसल्यामुळे येथे धुळीचे साम्राज्य आहे. (छाया : नसीर अत्तार)

Web Title: Modified: Dozens of candidates from 'Bazaargate'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.