सुधारित : लक्षणे नसलेल्यांना गृहविलगीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:22 AM2021-04-06T04:22:14+5:302021-04-06T04:22:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गतवर्षी कोरोना लाटेत सगळ्या रुग्णांना दवाखान्यातच भरती केल्याने बेडची संख्या अपुरी पडली. यंदा मात्र ...

Modified: Separate the home from those who do not have symptoms | सुधारित : लक्षणे नसलेल्यांना गृहविलगीकरण करा

सुधारित : लक्षणे नसलेल्यांना गृहविलगीकरण करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : गतवर्षी कोरोना लाटेत सगळ्या रुग्णांना दवाखान्यातच भरती केल्याने बेडची संख्या अपुरी पडली. यंदा मात्र घरी स्वतंत्र राहण्याची व्यवस्था असलेल्या व लक्षणे नसलेल्या रुग्णांचे गृहविलगीकरण करण्यात यावे, त्यामुळे गरजू रुग्णांसाठी बेड उपलब्ध राहतील, अशा सूचना सोमवारी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केल्या. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रत्येक तालुक्याला एक याप्रमाणे कोविड केंद्र सुरू करण्यात आले असून सद्य:स्थितीत आणि संभाव्य रुग्णसंख्या गृहीत धरून नियोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.

कोरोनाचा वाढत्या संसर्गाशी सामना करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सर्वाधिक रुग्णसंख्येचा विचार करून आरोग्यसेवा तयार ठेवाव्यात. कोल्हापूर महापालिकेने स्वतंत्र बैठक घेऊन नियोजन करावे. सीपीआरने पुन्हा एकदा यंत्रणा सक्रिय करावी, बंद असलेले व्हेंटिलेटर्स दुरूस्त करून घ्यावेत, असेही यावेळी बजावण्यात आले.

बैठकीस महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे उपस्थित होते.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, एप्रिलअखेर संभाव्य रुग्णसंख्या लक्षात घेऊन कोविड काळजी केंद्र सुरू करा. कारखानदारांची बैठक घेऊन कामगारांच्या लसीकरण आणि आरटीपीसीआर तपासणीबाबत नियोजन करा.

पालकमंत्री पाटील म्हणाले, सीपीआरमधील उपलब्ध खाटांच्या माहितीसाठी देण्यात आलेले मोबाइल रिचार्ज करा. रेमडेसिवरचा साठा ठेवा. महापालिका हद्दीत रिक्षा फिरवून जनजागृती करा. खाटांची संख्या, उपचार घेणारे रुग्ण याबाबत स्वतंत्र अधिकारी नियुक्त करून नियंत्रण ठेवा. पोलीस विभागाने गृहरक्षक दल मागणीबाबत प्रस्ताव पाठवावा.

मंत्री यड्रावकर म्हणाले, सीपीआरमध्ये उपचारासाठी मोठ्या संख्येने रुग्ण येत असल्याने खाटांची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्या. बंद व्हेंटिलेटर्स तत्काळ दुरुस्त करा.

--

उपलब्ध खाट : २ हजार ५३९

खासगी : ६५२, शासकीय : १ हजार ८८७

ऑक्सिजन नसलेले बेड : १ हजार ४१७

ऑक्सिजन बेड : ९९०

आयसीयू : २२७

व्हेंटिलेटर्स -२०२

रक्ताची उपलब्धता : १ हजार ५०० बॅग

ऑक्सिजनची उपलब्धता- ५० मेट्रिक टन

लसीकरण-

पहिला डोस- ३ लाख ६१ हजार ६६८ पूर्ण

दुसरा डोस- २६ हजार २६८ पूर्ण

एप्रिलअखेर १५ लाख जणांचे लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन.

----

१५ टक्के रुग्ण पुणे-मुंबईचे

सध्याच्या कोरोना रुग्णांमध्ये १५ टक्के रुग्ण हे मुंबई-पुण्याहून परतलेले नागरिक आहेत. शिवाय उपचारासाठी येणाऱ्यांमध्ये सांगली, सातारा, कोकण, कर्नाटक अशा अन्य जिल्ह्यांतील रुग्णांची संख्याही मोठी आहे. या जिल्ह्यांनी रुग्णांना आरोग्यसेवा द्याव्यात, असे झाल्यास कोल्हापूरवर अतिरिक्त ताण पडणार नाही.

---

फोटो नं ०५०४२०२१-कोल-कोरोना आढावा बैठक

ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी कोरोना आढावा बैठक घेतली. यावेळी आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे उपस्थित होते.

Web Title: Modified: Separate the home from those who do not have symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.