(सुधारित) थरारक पाठलाग अन्‌ झटापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:47 AM2021-03-04T04:47:23+5:302021-03-04T04:47:23+5:30

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाकडून आलेली दरोडेखोरांची मोटारकार टेहळणीवरील दोघा पोलिसांनी दुचाकीवरून थरारक पाठलाग करीत सायबर चौकात दबा धरून बसलेल्या ...

(Modified) Thrilling chase and struggle | (सुधारित) थरारक पाठलाग अन्‌ झटापट

(सुधारित) थरारक पाठलाग अन्‌ झटापट

Next

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाकडून आलेली दरोडेखोरांची मोटारकार टेहळणीवरील दोघा पोलिसांनी दुचाकीवरून थरारक पाठलाग करीत सायबर चौकात दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाला सतर्क केले. पुढे सायबर चाैकात मोटारकार येताच तिला आडवी दुचाकी घालून ती अडविली. सापळा रचलेल्या पोलिसांनी मोटारीवर झडप घालून दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या.

कराडमधील दरोडेखोर कोल्हापुरात निळसर सिल्व्हर मोटारीतून येणार असल्याची गोपनीय माहिती राजारामपुरी पोलीस ठाण्याचे काॅन्स्टेबल महेश पोवार यांना सायंकाळी ५ वाजता मिळाली. त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली. सायबर चौकात पोलिसांनी सापळा रचला, तर महेश पोवार व सुरेश नाळे हे पोलीस दोघे दुचाकीवरून संशयित मोटारीचा शिवाजी विद्यापीठ मार्गावर माग काढत होते. त्यावेळी विद्यापीठाकडून सुसाट निळसर सिल्व्हर रंगाची मोटारकार सायबर चौकाकडे धावली. पोवार व नाळे यांनी दुचाकीवरून मोटारीचा थरारक पाठलाग केला. पुढे सायबर चौकात एका हॉटेलनजीक महेश पोवार याने दुचाकी मोटारीच्या आडवी घालून थांबविली. मोटार घासल्याने पोवार यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्याक्षणीच पोलीस उपनिरीक्षक समाधान घुगे यांनी जिवाची पर्वा न करता प्रथम चालकावर झडप घालून त्याचा ताबा घेतला. इतरांनी मोटारीस घेराव घालून पाचही दरोडेखोरांना काही कळण्यापूर्वीच पकडले, दरोडेखोर पळून जाण्याच्या प्रयत्नात त्यांची पोलिसांशी झटापटही झाली.

पाचही जणांची झडती घेतली असता अजिंक्य भोपळे याच्या कमरेला मॅगझिनसह गावठी पिस्तूल मिळाले, तसेच मोटारीत तलवारी, दोरी, मोबाइल, बॅटऱ्या आदी प्राणघातक शस्त्रसाठा सापडला. पोलिसांनी शस्त्रसाठा व मोटार जप्त केली.

कारवाईत पोलीस उपनिरीक्षक समाधान घुगे यांच्यासह कॉस्टेबल महेश पोवार, सुरेश नाळे, भूषण ठाणेकर, उत्तम माने, युक्ती ठोंबरे, सचिन देसाई, सुशांत तळप यांचा समावेश होता.

फोटो नं. ०३०३२०२१-कोल-समाधान घुगे (पीएसआय)

फोटो नं. ०३०३२०२१-कोल- महेश पोवार (पोलीस कॉन्स्टेबल)

फोटो नं. ०३०३२०२१-कोल- सुरेश काळे (पोलीस कॉन्स्टेबल)

Web Title: (Modified) Thrilling chase and struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.