दि मोहामेडन एज्यु. सोसायटीची निवडणूक घ्या

By admin | Published: March 19, 2017 03:00 PM2017-03-19T15:00:36+5:302017-03-19T15:00:36+5:30

धर्मादाय उपायुक्तांचा आदेश : २०१० नंतरचे २१०० सभासद अपात्र

The Mohamedan Education Take the election of society | दि मोहामेडन एज्यु. सोसायटीची निवडणूक घ्या

दि मोहामेडन एज्यु. सोसायटीची निवडणूक घ्या

Next

आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १९ : येथील दि मोहामेडन एज्युकेशन या संस्थेची (मुस्लिम बोर्डींग) त्रैवार्षिक निवडणूक घेण्यात यावी या आदेश धर्मादाय उप आयुक्तांनी दिला आहे. या निवडणुकीसाठी नव्याने केलेल्या २१०० सभासदांना त्यांनी अपात्र ठरविले आहे. धर्मादाय उपायुक्त एस.यु. वडगावकर यांनी हा निकाल दिला.
या सोसायटीचे संचालक मंडळ निवडणूका टाळत असल्याबाबतची तक्रार अर्ज के.एम. बागवान व मुस्ताक मुल्ला यांनी धर्मादाय उपायुक्तांकडे केला होता. याची दखल घेत हे निवडणूक घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यापूर्वी या सोसायटीची त्रैवार्षिक निवडणूक २००७ ला झाली होती. या निवडणूकीत विजयी झालेल्या संचालकांची मर्यादा २०१० पर्यत होती, मात्र त्यानंतर आजपर्यत निवडणूक घेण्यात आल्या नाहीत. घटनेप्रमाणे दरवर्षी सर्वसाधारण सभा घेणे बंधनकारक आहे, पण या संचालकांनी फक्त दोनच सभा घेतल्या, त्याविरोधात बागवान व मुल्ला यांनी धर्मादाय उपायुक्तांकडे दाद मागितली होती. पण त्यानंतरही विद्यमान संचालक मंडळाने सुमारे २१०० नवीन सभासद बेकायदेशीरपणे वाढविले. पण हेच २०१० नंतर नव्याने केलेल्या सभासदांना धर्मादाय उपायुक्तांनी मतदानास अपात्र ठरविले आहे. (प्रतिनिधी)

निवडणूक अधिकारी नेमा
या सोसायटीवर १० एप्रिलपर्यत निवडणूक अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश धर्मादाय उपायुक्तांनी दिले आहेत. या नियुक्तीसाठी २०१० पूवीच्या सभासदांची वार्षीक सर्वसाधारण सभा बोलवावी. या सर्व प्रक्रियेससाठी निरीक्षकपदी असीफ शेख यांची नियुक्ती केल्याची माहिती अ‍ॅड. प्रविण कदम यांनी दिली.

Web Title: The Mohamedan Education Take the election of society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.