मुरगूडला वायफाय सिटी करण्याचा संकल्प

By admin | Published: March 4, 2016 12:48 AM2016-03-04T00:48:16+5:302016-03-04T00:51:59+5:30

अर्थसंकल्प सभा खेळीमेळीत : पावणेदोन कोटी रुपये शिलकी अंदाज पत्रकास मंजुरी

Moirgood's commitment to City Wifi | मुरगूडला वायफाय सिटी करण्याचा संकल्प

मुरगूडला वायफाय सिटी करण्याचा संकल्प

Next

  मुरगूड : युवा वर्गाला मोफत नेट सुविधा पुरविण्यासाठी येत्या काही दिवसांत मुरगूड शहर वायफाय सिटी म्हणून विकसित करण्याचा संकल्प पालिकेच्या विशेष सभेत केला. महसुली शिल्लक ३४६८२७ रुपये व भांडवली शिल्लक १ कोटी ८० लाख रुपये असून, एकूण १ कोटी ८३ लाख बारा हजार ६२२ रुपये शिलकीच्या अंदाज पत्रकास सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. बगीचा, क्रीडांगण, सांडपाणी प्रक्रिया, विरंगुळा केंद्र, आदींसाठी अंदाजपत्रकामध्ये भरीव तरतूद करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा रेखा सुधीर सावर्डेकर होत्या. दोन्ही गटाकडून मागील सभेवेळी झालेल्या वादावादीबाबत दिलगिरीही व्यक्त करण्यात आली. दरम्यान, सभागृहात मुख्याधिकारी बी. एस. जगताप, शहर अभियंता प्रकाश पोतदार, शशिकांत मोहिते, संतोष गुरव, सूर्याजी घोरपडे, अनिल गंदमवाड, अशोक तांबट, रणजित निंबाळकर, मारुती शेट्टी, दिलीप कांबळे, अमर कांबळे, यांनी सभागृहाला कार्यालयीन माहिती पुरविली. अंदाजपत्रकानुसार २०१५-१६ मध्ये सुधारित महसुली एकूण जमा रक्कम ३ कोटी ६१ लाख ४२ हजार ९०१ इतकी असून, महसुली खर्च ३ कोटी ५७ लाख ९६ हजार ७४ रुपये झाला आहे. यातून शिल्लक रक्कम ३ लाख ४६ हजार ८२७ असून, २०१६-१७ मध्ये संभाव्य अंदाजपत्रकात महसुली जमा ४ कोटी ३४ लाख ४६ हजार ४७३ धरली असून, संभाव्य महसुली खर्च ४ कोटी २७ लाख ७६ हजार गृहीत धरला आहे. त्यामुळे अंदाजे शिल्लक ६ लाख ७० हजार ४०४ इतकी रक्कम गृहीत धरली आहे. भांडवली विभागातून २०१५-१६ मध्ये ५ कोटीमध्ये ३४ लाख ८३ हजार ८४७ इतकी रक्कम जमा असून, खर्च ३ कोटी ५५ लाख १८ हजार ५२ रुपये झाल्याने शिल्लक १ कोटी ७९ लाख ६५ हजार ७९५ इतकी दाखविली आहे. सन २०२६-१७ च्या संभाव्य अंदाजपत्रकात १३ कोटी ३० लाख ६२ हजार संभाव्य रक्कम जमा, तर खर्च अपेक्षित १० कोटी १० लाख ५३ हजार गृहीत धरला असून, शिल्लक तीन कोटी २० लाख ९ हजार रुपये गृहीत धरले आहेत. पालिकेला २०१५-१६ मध्ये महसुलामधून ३ कोटी ६१ लाख उत्पन्न मिळाले असून, येत्या वर्षामध्ये ७० लाखांची वाढ अपेक्षित धरली आहे. जनावर बाजार, शिंगोटी दाखला आदींतून ८ लाख ५ हजार उत्पन्न मिळाले असून, येणाऱ्या वर्षामध्ये त्यामध्ये दीड लाखाची वाढ अपेक्षित आहे. नगर परिषद मालमत्तांपासून भाड्याचे उत्खनन १९ लाख ७८ हजार रुपये मिळाले असून, त्यामध्ये साधारणत: सव्वा लाखाची वाढ अपेक्षित धरली आहे. राजेखान जमादार यांनी मागील सभेच्या वेळी आम्ही विरोध केला. लोकशाहीमध्ये प्रबळ विरोधक असले पाहिजेत असे सांगून तो तात्विक वाद असल्याचे सांगून अंदाजपत्रकात शहरातील विकासासाठी भरीव तरतूद असली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. विरोधी पक्षनेता किरण गवाणकर यांनी मुरगूड शहराच्या विकासासाठी मंडलिक गटाच्या सर्व सदस्यांचा कायम पाठिंबा राहील, असे आश्वासन देऊन माजी खासदार सदाशिवराव मंडलिक स्मृती व्याख्यानमालेसाठी भरीव तरतूद पालिकेने करावी, अशी मागणी केली. उपनगराध्यक्ष अजितसिंह पाटील, माजी उपनगराध्यक्ष संतोष वंडकर, दगडू शेणवी, परेश चौगले, किरण गवाणकर, राजेखान जमादार, नम्रता कुंभार, गौराबाई सोनुले, माया चौगले, नम्रता भांदीगरे, कुलाबाई कांबळे, सुजाता पाटील, वैशाली सुतार, रूपाली सणगर, अनिता भोसले, आदींनी चर्चेत सहभाग घेतला. रेखा सावर्डेकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)

Web Title: Moirgood's commitment to City Wifi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.