घनकचºयातून ६५० टन सेंद्रिय खताची निर्मिती- मलकापूर पालिका : कचरा डेपोचा प्रश्न निकाली, खत विक्रीतून दोन लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 11:26 PM2018-01-09T23:26:25+5:302018-01-09T23:26:59+5:30
मलकापूर : मलकापूर नगरपालिकेने स्वच्छ भारत आभियानांतर्गत कचरा डेपोवर घनकचरा प्रकल्प राबवून कचºयापासून ६५० टन सेंद्रिय खत निर्मिती केली आहे.
मलकापूर : मलकापूर नगरपालिकेने स्वच्छ भारत आभियानांतर्गत कचरा डेपोवर घनकचरा प्रकल्प राबवून कचºयापासून ६५० टन सेंद्रिय खत निर्मिती केली आहे. या सेंद्रिय खत विक्रीतून पालिकेला दोन लाख रुपये मळाले आहेत. त्यामुळे साठ वर्षांचा कचरा डेपोचा प्रश्न निकाली काढला आहे. महाराष्ट्रात कचºयापासून सेंद्रिय खत निर्मिती करणाºया पुणे झोनमध्ये मलकापूर नगरपालिका पाहिली ठरली आहे .
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ, सुंदर मलकापूर शहराचे स्वप्न साकारण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने लोकसहभागाला प्राधान्य दिले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून शहरात स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. मलकापूर शहरात रोज दीड टन कचरा जमा होतो. हा जमा झालेला कचरा उचत येथील डेपोवर टाकला जातो. गेली साठ वर्ष शहरातील कचरा येथे टाकला जात होता. मुख्याधिकारी अॅलोस पोरे, पालिकेचे उपनगराध्यक्ष दिलीप पाटील यांच्या संकल्पनेतून घनकचरा प्रकल्प राबविण्याचा निर्णय झाला. याला सर्व नगरसेवकांनी संमती दिली. पालिका प्रशासनाने तातडीने कचरा डेपोवर मशिनरी बसवून कचºयापासून सेंद्रिय खत निर्मिती केली. शहरातील आजूबाजूच्या खेडेगावातील शेतकºयांनी सेंद्रिय खत विकत नेले. त्यामुळे पालेकेने ६५० टन खताची विक्री केले. यापासून पालिकेला दोन लाख रुपये उत्पन्न मिळाले. या सेंद्रिय खतासाठी शेतकºयांनी मागणी नोंदविली आहे.
खत निर्मितीसाठी उपनगराध्यक्ष दिलीप पाटील यांनी दहा दिवस कचरा डेपोवर थांबून कर्मचाºयांकडून कामे करून घेतली आहेत. याच कचरा डेपोवर पालिका प्रशासनाने लोकसहभागातून सुंदर अशी बाग फुलविली आहे. या कचरा डेपोवर प्लास्टिक बॉटल क्रशिंग करण्याचे मशीन बसविले आहे.
पालिकेच्या या घनकचरा प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी फोन करून पालिकेचे अभिनंदन केले आहे. कोल्हापूरचे उपमहापौर सुनील पाटील यांनी या प्रकल्पाला भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली आहे. पालिकेला एक कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. स्वच्छ सुंदर मलकापूरसाठी नगराध्यक्ष अमोल केसरकर, उपनगराध्यक्ष दिलीप पाटील, बांधकाम सभापती राजू प्रभावळकर, मुख्याधिकारी अॅलिस पोरे, नगरसेवक, नगरसेविका, नागरिक महिला मंडळ बचत गट यांचे सहकार्य मिळत आहे.
पाटील यांचे योगदान
उपनगराध्यक्ष दिलीप पाटील यांनी स्वत: घनकचरा प्रकल्पासाठी मशिनिरी उपलब्ध करून देऊन प्रकल्प चालू केला आहे. प्रकल्पावर स्वत: थांबून कर्मचाºयांकडून कामे करून घेतली. शेतकºयांशी संवाद साधून खत विक्री केली. स्वच्छ, सुंदर मलकापूरचे दिलीप पाटील आयडॉल ठरले आहेत .