चिमुकल्यांना मिळाली मायेची ऊब

By Admin | Published: November 17, 2014 12:02 AM2014-11-17T00:02:50+5:302014-11-17T00:23:14+5:30

कपडे संकलन मोहीम : ‘अवनि’ सरसावली --०इनिशिएटिव्ह

Mom gets bored | चिमुकल्यांना मिळाली मायेची ऊब

चिमुकल्यांना मिळाली मायेची ऊब

googlenewsNext

कोल्हापूर : शहरातील झोपड्यांमध्ये थंडीत कुडकुडणाऱ्या चिमुकल्यांची व्यथा ‘लोकमत इनिशिएटिव्ह’च्या माध्यमातून मांडल्यानंतर कोल्हापूरकरांकडून त्याला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
आज, रविवारी पेठवडगाव, शिंगणापूर, रुईकर कॉलनी, फुलेवाडी, आदी परिसरांतील नागरिकांनी भेटून आणि दूरध्वनीवरून संपर्क साधून मदत देण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. या चिमुकल्यांच्या मदतीसाठी ‘अवनि’ संस्था सरसावली आहे. वंचित मुलांसाठी कार्यरत असलेल्या या संस्थेने ‘लोकमत’च्या उपक्रमात सहभागी होण्यासह नागरिकांकडून मिळणारे कपडे एकत्रित संकलित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
यादवनगर-डवरी वसाहत, विचारेमाळ, संभाजीनगर पेट्रोल पंपामागील वसाहत, वारे वसाहत, मुडशिंगीच्या माळावरील झोपडपट्टी, आदी वसाहतींमध्ये उघड्यावर आयुष्य जगणाऱ्या कुटुंबांना आपण सर्वांनी मिळून मदतीचा हात दिला, तर झोपड्यांमध्ये कुडकुडणाऱ्या चिमुकल्यांना माणुसकीची ऊब मिळेल, असे आवाहन ‘लोकमत’ने केल्यानंतर मदतीसाठी कोल्हापूरकर उत्स्फूर्तपणे पुढे येत आहेत.
आज, शिंगणापूर येथील सराफ व्यावसायिक जयसिंग संकपाळ, देवकर पाणंद येथील मानसी कुलकर्णी, जुनी मोरे कॉलनीतील मनीषा पाटील, रुईकर कॉलनीतील संजीवनी सूर्यवंशी, फुलेवाडीतील महाविद्यालयीन विद्यार्थिनी राजबन्सी माने, पेठवडगावमधील प्रकाश पेटकर यांच्यासह अनेकांनी ‘लोकमत’शी संपर्क साधून मदत देणार असल्याचे सांगितले. अजूनही मदत करावयाची असेल, तर त्यांनी ‘लोकमत इनिशिएटिव्ह’ ९९२२४३८३८८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Web Title: Mom gets bored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.