‘अकौंटिंगमधील रोजगार-स्वयंरोजगार’ यावर सोमवारी व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:27 AM2021-02-09T04:27:40+5:302021-02-09T04:27:40+5:30
कोल्हापूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे बेरोजगार युवक-युवतींसाठी सोमवारी (दि. १५) ‘अकौंटिंग क्षेत्रातील रोजगार व ...
कोल्हापूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे बेरोजगार युवक-युवतींसाठी सोमवारी (दि. १५) ‘अकौंटिंग क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगार संधी’ या विषयावर सीए संध्या मराठे यांचे ऑनलाईन मार्गदर्शन सत्र आयोजित केले आहे. हे सत्र दुपारी ३ ते ४ यादरम्यान होणार आहे. या मार्गदर्शन सत्राचा जास्तीत जास्त युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकासचे सहायक आयुक्त संजय माळी केले आहे.
हयातीसह उत्पन्नाचे दाखले जमा करून घ्यावेत
कोल्हापूर : विशेष साहाय्य योजनेतील हयातीचे व उत्पन्नाचे दाखले तलाठी कार्यालयाने जमा करून घ्यावेत, अशी मागणी संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती, करवीर तालुकातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
शासनाच्या विशेष साहाय्य योजनेअंतर्गत निराधार दिव्यांग, अंध, परित्यक्ता अधिनसारख्या दुर्बल घटकांना अर्थसाहाय्य देण्याच्या हेतूने ही योजना राबविली आहे. कोरोनामुळे लाभार्थींना हयातीचे व उत्पन्नाचे दाखले देण्यास मुदतवाढ दिली होती. त्यानंतर ही कागदपत्रे मंडल अधिकारी व तलाठ्यांनी जमा करून संजय गांधी निराधार अनुदान योजना शाखेकडे पाठवावीत. अशी मागणी या निवेदनात केली आहे. यावेळी समितीचे करवीर सदस्य संतोष कांबळे, शिवाजी राजिगरे आदी उपस्थित होते.