सोमवारपासून अंबाबाई , जोतिबा मंदिराचे स्ट्रक्चरल आॅडिट --महेश जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 05:26 PM2020-02-13T17:26:20+5:302020-02-13T17:29:40+5:30
कोल्हापुरात रस्त्यांच्या कामांसाठी आणि पाणी योजनेच्या मोटरदुरुस्तीसाठी पाच कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. देवस्थानच्या २७ हजार ९०० एकर जमिनीची कागदपत्रे देवस्थानकडे जमा झाली असून, अजूनही सहा ते सात हजार एक जमिनीची कागदपत्रे संकलित होतील.
कोल्हापूर : अंबाबाई मंदिर आणि जोतिबा मंदिराच्या स्ट्रक्चरल आॅडिटच्या कामाला सोमवार (दि. १७)पासून प्रारंभ होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
देवस्थान समितीच्या जुन्या बलभीम बॅँकेच्या इमारतीमधील कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत जाधव यांनी त्यांच्या नियुक्तीपासून घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. यावेळी समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, सचिव विजय पोवार, अभियंता देशपांडे उपस्थित होते.
जाधव म्हणाले, मुंबईची स्ट्रकवेल कंपनी हे स्ट्रक्चरल आॅडिटचे काम करणार आहे. सोमवारपासून अंबाबाई मंदिराचे व त्यानंतर जोतिबा मंदिराचे आॅडिट करण्यात येईल. कोल्हापुरात रस्त्यांच्या कामांसाठी आणि पाणी योजनेच्या मोटरदुरुस्तीसाठी पाच कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
सामाजिक कामासाठी दीड कोटी रुपये
सीपीआरसाठी ७१ लाख, सावित्रीबाई फुले हॉस्पिटलसाठी १५ लाख, पंचगंगा हॉस्पिटलसाठी १५ लाख, कसबा बावडा सेवा रुग्णालयासाठी १० लाख, धर्मादाय कार्यालय, शहीद जवान यांना प्रत्येकी १० लाख, तीन जिल्ह्यांतील ३१ देवस्थानांना ७२ लाख रुपये जीर्णोद्धारासाठी दिल्याचे जाधव यांनी सांगितले.
- कोल्हापूर शहरामध्ये किती स्वच्छतागृहांची गरज आहे, तेवढ्या जागा उपलब्ध करून द्या.