रस्ता खुदाईसाठी भरलेली रक्कम ठेकेदारांच्या बिलांसाठी वापरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:51 AM2020-12-11T04:51:06+5:302020-12-11T04:51:06+5:30
इचलकरंजी : नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये एच.पी. ऑईल गॅस प्रा.लि. मुंबई या कंपनीने नगरपालिकेकडे चार कोटी ८१ लाख ६७ हजार ७३५ ...
इचलकरंजी : नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये एच.पी. ऑईल गॅस प्रा.लि. मुंबई या कंपनीने नगरपालिकेकडे चार कोटी ८१ लाख ६७ हजार ७३५ रुपये रस्ता खुदाई कामानंतर डांबरीकरणासाठी भरले आहेत. ही रक्कम स्वतंत्रपणे ठेवण्यात यावी, असा कौन्सिल ठराव केला आहे. मात्र, नगरपरिषदेच्या ठेकेदारांची थकीत बिले देण्यासाठी ही रक्कम वापरली असल्याची टीका नगरसेवक शशांक बावचकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली आहे.
पत्रकात, शहरातील दहा वॉर्डांतील १११ रस्त्यांसाठी ४३.७३ किलोमीटर इतक्या लांबीची गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी सदर कंपनीने पालिकेकडे परवानगी मागितली. दरम्यान, १६ सप्टेंबर २०२० ला पालिका सभेमध्ये पैसे भरून घेण्याच्या अटीवर परवानगी देण्यात आली. पैसे भरूनही काम सुरू होण्यापूर्वीच खुदाईनंतरचे डांबरीकरण करण्याचे अंदाजपत्रक तयार केले. बजेट नसताना निविदा काढणे हे बेकायदेशीर असून, याची दक्षता घ्यावी; अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा इशाराही दिला आहे.