गडमुडशिंगी, न्यू वाडदेतील वानरांना केले जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:21 AM2021-05-15T04:21:34+5:302021-05-15T04:21:34+5:30
गडमुडशिंगी व न्यू वाडदे (ता करवीर) येथील शेतांमध्ये उच्छाद मांडलेल्या ४० ते ४५ वानरांना वन विभाग, ग्रामपंचायत प्रशासन ...
गडमुडशिंगी व न्यू वाडदे (ता करवीर) येथील शेतांमध्ये उच्छाद मांडलेल्या ४० ते ४५ वानरांना वन विभाग, ग्रामपंचायत प्रशासन व स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने जेरबंद करण्यात आले. गडमुडशिंगी व न्यू वाडदे येथील गावात व शेती परिसरात या मोकाट वानरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. त्यामुळे या परिसरात महिलावर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शेतीचे व घरांचे वानरांमुळे प्रचंड नुकसान होत होते. त्यामुळे या वानरांना जेरबंद करणे गरजेचे होते. दोन्ही गावांतील शेतकऱ्यांनी वानरांना पकडण्याची विनंती वनविभागाला केली. त्यानुसार वनविभागाने या वानरांना जेरबंद केले. जेरबंद केलेल्या वानरांना काळमवाडी येथील अभयारण्यात सोडण्यात आले.
फोटो : १४ गडमुडशिंगी वानर
ओळ- गडमुडशिंगी न्यू वाडदे येथील गावभाग परिसरात उच्छाद मांडलेल्या वानरांना स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने वनवभागाच्या अधिकाऱ्यांनी जेरबंद केले. यावेळी मा. ग्रा.पं. सदस्य पांडुरंग पाटील, रावसाहेब पाटील, वनकर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.