अतिक्रमणाबाबत महिन्यात निर्णय

By admin | Published: May 7, 2016 01:04 AM2016-05-07T01:04:01+5:302016-05-07T01:13:43+5:30

सीपीआरमधील प्रश्न : चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती; अभ्यागत समितीची बैठक

Month Decision regarding encroachment | अतिक्रमणाबाबत महिन्यात निर्णय

अतिक्रमणाबाबत महिन्यात निर्णय

Next

कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामधील (सीपीआर) अनधिकृत अतिक्रमणाबाबत महिन्यात निर्णय घेऊ, त्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाने संबंधितांना प्रथम अतिक्रमणवाल्यांना नोटिसा द्याव्यात, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी सांगितले. ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सीपीआर अभ्यागत समितीच्या बैठकीत बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सकडॉ. एल. एस. पाटील, अभ्यागत समितीचे महेश जाधव यांच्यासह सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती. अधिष्ठाता यांच्या दालनात ही बैठक सायंकाळी झाली.
यावेळी चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, सीपीआर रुग्णालय आवारातील अतिक्रमणांबाबत एका महिन्यात निर्णय घ्या. तसेच शेंडा पार्क येथील रुग्णालयाची संरक्षक भिंत, सीपीआर रुग्णालयातील हृदय शस्त्रक्रिया विभाग, राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत होणाऱ्या या शस्त्रक्रिया, रिक्त पदे, रुग्णालय परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ, आदी विषयांवर त्यांनी चर्चा केली. त्यानंतर सीपीआरमधील सर्व विभागप्रमुख यांच्या अडीअडचणींबाबत विचारपूस केली.
राजेश क्षीरसागर यांनी राजीव गांधी जीवनदायी योजनेतील खासगी रुग्णालये रुग्णांकडून जादा पैसे घेतात. त्यामुळे त्यांची स्वतंत्र बैठक घ्यावी, अशी सूचना केली. त्यावर लवकरच बैठक घेऊ, असे चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. बैठकीस राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. अशोक देठे, अभ्यागत समितीचे सुनील करंबे, डॉ. अजित लोकरे, यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.

Web Title: Month Decision regarding encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.