मुरगूडला विभागीय कुस्ती स्पर्धेला उत्साहात सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 01:12 AM2017-10-25T01:12:33+5:302017-10-25T01:14:49+5:30
मुरगूड : शिवाजी विद्यापीठ अंतर्गत आंतर विभागीय कुस्ती स्पर्धा मुरगूड ता. कागल येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात उत्साहात सुरु झाल्या आहेत.
मुरगूड : शिवाजी विद्यापीठ अंतर्गत आंतर विभागीय कुस्ती स्पर्धा मुरगूड ता. कागल येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात उत्साहात सुरु झाल्या आहेत. या स्पर्धेसाठी सांगली, कोल्हापूर व सातारा या तीन जिल्ह्यांतून पुरुष गटात १८0 तर महिला गटात ३0 मल्लांनी विक्रमी सहभाग नोंदविला आहे.
या स्पर्धेत पुरुषांच्या फ्री स्टाइल व ग्रीको रोमन तर महिलांच्या फ्री स्टाइल प्रकारांत कुस्ती स्पर्धा पार पडत आहेत. या स्पर्धेअंती शिवाजी विद्यापीठाचा अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठीचा संघ निवडला जाणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन मंडलिक साखर कारखान्याचे संचालक वीरेंद्र मंडलिक यांच्या हस्ते तर जय शिवराय एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष गजानन गंगापुरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
वीरेंद्र मंडलिक म्हणाले, माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी कुस्तीला चालना मिळावी, यासाठी विशेष परिश्रम घेतले होते. त्यांच्या प्रयत्नातूनच मुरगूडला आंतरराष्टÑीय कुस्ती प्रशिक्षण देणारा साई आखाडा सुरू झाला. त्यामुळेच मुरगूडचे नाव आज आंतरराष्टÑीय स्तरावर घेतले जाते. आज मुरगूड परिसरात आंतरराष्टÑीय स्तरावरचे मल्ल घडू लागले ही अभिमानाची गोष्ट आहे.
संयोजक प्रा. शिवाजी पोवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार, उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले, सुखदेव येरुडकर, नामदेवराव मेंडके, शिवाजीराव चौगले, पांडुरंग भाट, सुहास खराडे, राष्टÑीय प्रशिक्षक दादासो लवटे, किरण गवाणकर, बाजीराव गोधडे, उपप्राचार्य शिवाजीराव होडगे, दिलीपराव कांबळे टी. एम. पाटील उपस्थित होते.
या स्पर्धेतून अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कुस्ती स्पर्धेसाठी पुरुष गटातून फ्री स्टाइल १0 मल्ल, पुरुष ग्रीको रोमन १0 मल्ल व महिला फ्री स्टाइल १0 मल्ल असा ३0 मल्लांचा संघ निवडण्यासाठी निवड समिती सदस्य प्रा, संभाजी पाटील, दिलीप पवार (सातारा), बाजीराव पाटील (तिसंगी), उत्तमराव पाटील (सांगली), भाऊसाहेब पाटील (सांगली), चंद्रकांत चव्हाण (राज्य समन्वयक) हे उपस्थित होते. पंच म्हणून राजाराम चौगले, दादासो लवटे, बापूसो लोखंडे, संभाजी पाटील, मारुती उर्फ बट्टू जाधव, संदीप पाटील, संभाजी वरुटे, बबन चौगले, बाळासाहेब मेटकर, प्रकाश खोत, दयानंद खतकर, प्रवीण मांगोरे, सागर देसाई, संदीप गायकवाड यांनी काम पाहिले. समालोचन राजाराम चौगले यांनी केले.
मुरगूड येथे सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ अंतर्गत आंतर विभागीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन वीरेंद्र मंडलिक यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य अर्जुन कुंभार, जयसिंग भोसले, सुखदेव येरुडकर, नामदेवराव मेंडके, शिवाजीराव चौगले, पांडुरंग भाट, सुहास खराडे, दादासो लवटे, किरण गवाणकर, शिवाजीराव होडगे उपस्थित होते.