आशांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 12:41 PM2021-06-21T12:41:05+5:302021-06-21T12:49:16+5:30
CoronaVirus AshaWorkers Kolhapur : महाराष्ट्र राज्य आशा, गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीतर्फे विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आशा, गटप्रवर्तक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य आशा, गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीतर्फे विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आशा, गटप्रवर्तक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.
आशा, गटप्रवर्तक येथील रेल्वे स्टेशनवर जमा झाल्या आणि तेथून मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आल्या. जागतिक महामारीत आशा, गटप्रवर्तक स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केले. पण सरकारकडून त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले. कोरोनाच्या कामासाठी प्रती दिवसा ३३ रुपये मिळतात, गटप्रवर्तकांना प्रती दिवसा १५ रुपये मिळतात.
आरोग्य खात्यासारख्या महत्वपूर्ण क्षेत्रात काम करूनही आशा, गटप्रवर्तकांचे इतके कमी मानधन देवून आर्थिक शोषण होत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी आशा, गटप्रवर्तक यांनी काम बंद आंदोलन करून मोर्चा काढला.