शेतकऱ्यांच्या लुटीविरोधात महावितरणवर मोर्चा ‌‌- धनाजी चुडमुंगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:16 AM2021-07-05T04:16:03+5:302021-07-05T04:16:03+5:30

उदगाव : महावितरणकडून महापुराच्या काळात सुमारे पाच ते सहा महिने नदीवरील विद्युत मोटारी बंद असताना त्या काळातील वीजबिले शेतकऱ्यांना ...

Morcha on MSEDCL against looting of farmers - Dhanaji Chudamunge | शेतकऱ्यांच्या लुटीविरोधात महावितरणवर मोर्चा ‌‌- धनाजी चुडमुंगे

शेतकऱ्यांच्या लुटीविरोधात महावितरणवर मोर्चा ‌‌- धनाजी चुडमुंगे

Next

उदगाव : महावितरणकडून महापुराच्या काळात सुमारे पाच ते सहा महिने नदीवरील विद्युत मोटारी बंद असताना त्या काळातील वीजबिले शेतकऱ्यांना देण्यात आली आहेत. तसेच गेल्या वर्षभरात विद्युत मीटरचे रिडींग न घेताच शेतकऱ्यांना बिले अदा केली जात आहेत. त्यामुळे २ ऑगस्टला महावितरण कंपनीवर आंदोलन अंकुशच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी केले आहे.

चिंचवाड (ता. शिरोळ) येथे कृषिपंपधारकांचा मेळावा झाला. यावेळी चुडमुंगे म्हणाले, आंदोलन अंकुशतर्फे गेल्या वर्षभरापासून महावितरणविरूद्ध लढा सुरू आहे. महावितरण कंपनी शेतकऱ्यांना लुटण्याचे काम करत आहे. या लुटीला बळी न पडता शेतकऱ्यांनी जागरूक राहावे, असे आवाहन त्यांनी केले. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच सचिन पाटोळे होते.

यावेळी आप्पासो कदम, राकेश जगदाळे, भूषण गंगावणे, योगेश जाधव, अमर गावडे, शशिकांत काळे, कृष्णा देशमुख, सुरगोंडा पाटील, सुरेश चौगुले, मयूर काळे, पोपट पाटोळे, कलगोंडा पाटील, सचिन मिरजे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Morcha on MSEDCL against looting of farmers - Dhanaji Chudamunge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.