शिरढोण कृती समितीचा महावितरणवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:23 AM2021-03-18T04:23:52+5:302021-03-18T04:23:52+5:30
पन्नास टक्के वीज बिलाची रक्कम भरूनही महावितरणकडून वीज कनेक्शन तोडत असल्याने कृती समितीच्यावतीने येथील महावितरण कार्यालयावर बुधवारी दुपारी मोर्चा ...
पन्नास टक्के वीज बिलाची रक्कम भरूनही महावितरणकडून वीज कनेक्शन तोडत असल्याने कृती समितीच्यावतीने येथील महावितरण कार्यालयावर बुधवारी दुपारी मोर्चा काढण्यात आला. पन्नास टक्के वीज बिल भरलेल्या ग्राहकांची वीज कनेक्शन तोडू नये, उर्वरित वीज बिलाची रक्कम शासन निर्णय झाल्यानंतर भरण्यात येईल, अशी मागणी केली. यावेळी सहायक अभियंता मुल्ला यांनी लॉकडाऊन काळातील तीन महिन्यांतील वीज बिल शासन निर्णयापर्यंत राखून ठेवून उर्वरित रक्कम भरण्याचे आवाहन मोर्चेकऱ्यांना यावेळी कनिष्ठ अभियंता मेघा जाधव उपस्थित होत्या.
मोर्चामध्ये शहाबुद्दीन टाकवडे, सरपंच चंद्रकांत चव्हाण, अरविंद गुरव, भास्कर कुंभार, सचिन यादव, हैदराबादअली मुजावर, आण्णासो जाधव, आदी सहभागी झाले होते.
फोटो - १७०३२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - शिरढोण (ता. शिरोळ) येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी सहायक अभियंता सिकंदर मुल्ला यांनी निवेदन स्वीकारले.