अपंगांसाठी १२ कोटींहून अधिक रकमेची साधने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 11:38 AM2019-05-03T11:38:57+5:302019-05-03T11:41:20+5:30

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने गेल्या वर्षीपासून राबविण्यात येत असलेल्या ‘दिव्यांग उन्नती अभियान’ला चांगले यश मिळण्याची चिन्हे असून, १२ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची वैविध्यपूर्ण साधने दिव्यांगांना पुरविण्यात येणार आहेत. यासाठी आता जिल्ह्यात तालुकावार तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

More than 12 crores worth of funds for the disabled | अपंगांसाठी १२ कोटींहून अधिक रकमेची साधने

अपंगांसाठी १२ कोटींहून अधिक रकमेची साधने

googlenewsNext
ठळक मुद्देअपंगांसाठी १२ कोटींहून अधिक रकमेची साधने, तालुकावर तपासणी शिबिरेजिल्हा परिषदेच्या ‘दिव्यांग उन्नती अभियान’चे यश

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या वतीने गेल्या वर्षीपासून राबविण्यात येत असलेल्या ‘दिव्यांग उन्नती अभियान’ला चांगले यश मिळण्याची चिन्हे असून, १२ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची वैविध्यपूर्ण साधने दिव्यांगांना पुरविण्यात येणार आहेत. यासाठी आता जिल्ह्यात तालुकावार तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

या योजनेच्या पहिल्या टप्प्यात गतवर्षी सुरुवातीला ७ जुलै रोजी गृहभेटीद्वारे दिव्यांगांचे सर्वेक्षण करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात २१ प्रकारच्या दिव्यांगांमध्ये ४१ हजार १३६ दिव्यांगांची आॅनलाईन नोंद करण्यात आली. आता तिसºया टप्प्यामध्ये या सर्वांना साधने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

त्यानुसार या विभागाकडून अलिम्को कंपनीला कोल्हापूर जिल्ह्यात तपासणी शिबिरे आयोेजित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ११ एप्रिल २०१९ रोजी या कंपनीचे प्रतिनिधी कोल्हापूर जिल्हा परिषदेत येऊन त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, ज्यांनी या योजनेची संकल्पना मांडून तिची अंमलबजावणी सुरू केली, ते सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ तसेच ज्या विभागांतर्गत ही योजना सुरू आहे, ते समाजकल्याण विभागाचे प्रभारी जिल्हा समाजकल्याण अधिकारी डॉ. संजय शिंदे यांच्याशी चर्चा केली. यावेळी यासाठी कार्यरत असलेल्या स्वाती गोखले यादेखील उपस्थित होत्या.

आता ११ ते २६ मे २०१९ या कालावधीत भुदरगड, करवीर, हातकणंगले, शिरोळ, कागल, राधानगरी, गडहिंग्लज, आजरा, चंदगड, कोल्हापूर, इचलकरंजी, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी येथे तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

यासाठीची जिल्हास्तरीय कार्यशाळा मंगळवारी (दि. ३० एप्रिल) झाली असून २ ते ६ मे दरम्यान तालुकास्तरीय, तर ७ मे रोजी ग्रामपंचायत स्तरावरील कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. त्या-त्या तालुक्यांच्या शिबिराच्या तारखा नंतर जाहीर करण्यात येणार असून, सकाळी ८.३० ते सायंकाळी पाच या वेळेत ही शिबिरे होणार आहेत. यासाठी प्रत्येक पंचायत समितीला २५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त या शिबिराला जो खर्च येईल, तो स्थानिक पातळीवर दानशूर व्यक्ती आणि संस्थांच्या माध्यमातून करावा, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. तालुक्याला शाळेच्या ठिकाणी हे शिबिर घ्यावे. तसेच तेथे मंडप उभारावा, पिण्याच्या पाण्याची, शौचालयाची व्यवस्था असावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

नेण्या-आणण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीमार्फत

त्या-त्या गावातील दिव्यांगांची शिबिरामध्ये ने-आण करण्यासाठी ग्रामपंचायतीने जबाबदारी घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून, त्या-त्या मार्गावरील ग्रामपंचायतींनी हा खर्च विभागून करावा. तसेच शासकीय वाहनातूनही या दिव्यांगांना आणण्याची व्यवस्था करावी, असे याबाबतच्या आदेशात म्हटले आहे.

हे मिळणार साहित्य

या शिबिरात केवळ दिव्यांगांची तपासणी होणार असून, त्यांना गरजेनुसार व्हीलचेअर, ट्रायसिकल, कुबड्या, एल्बो क्रचेस, रोलेटर, कॅलिपर, कृत्रिम अवयव, श्रवणयंत्र, एमआर किट, स्मार्ट केन, लो व्हिजन कट, डायसी प्लेअर, कुष्ठरोग किट या साहित्याचे दोन महिन्यांनंतर वितरण करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेने महत्त्वाकांक्षी असा ‘दिव्यांग उन्नती अभियान’ हा उपक्रम गेल्या वर्षीपासून सुरू केला असून, यामध्ये दिव्यांगांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली आहे. या सर्वांना आवश्यक असणारी साधने पुरविण्यासाठी जिल्हा परिषदेने संबंधित विभाग आणि कंपन्यांशी संपर्क साधला आहे. यातील पुढचा टप्पा म्हणून तालुकास्तरावर तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली असून, यावेळी दिव्यांग अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून या योजनेचा फायदा घेतला, असा विश्वास आहे.
- शौमिका महाडिक,
अध्यक्षा, जिल्हा परिषद, कोल्हापूर

Web Title: More than 12 crores worth of funds for the disabled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.