दीड लाखाहून अधिक वाहने पहिल्या टप्प्यात जाणार भंगारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:20 AM2021-02-08T04:20:49+5:302021-02-08T04:20:49+5:30

कोल्हापूर : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केंद्र सरकारने पंधरा वर्षांवरील वाहनांबाबत स्क्रॅप धोरण जाहीर केले आहे. यात प्रथम व्यावसायिक आणि ...

More than 1.5 lakh vehicles will be scrapped in the first phase | दीड लाखाहून अधिक वाहने पहिल्या टप्प्यात जाणार भंगारात

दीड लाखाहून अधिक वाहने पहिल्या टप्प्यात जाणार भंगारात

googlenewsNext

कोल्हापूर : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केंद्र सरकारने पंधरा वर्षांवरील वाहनांबाबत स्क्रॅप धोरण जाहीर केले आहे. यात प्रथम व्यावसायिक आणि खासगी वापरातील वाहने असे वर्गीकरण केले आहे. हे धोरण टप्प्याटप्प्याने राबविले जाणार आहे. या धोरणानुसार कोल्हापूर जिल्ह्यात एकूण पाच लाखांहून अधिक वाहने या धोरणात बसणारी आहेत. पहिल्या टप्प्यात १ लाख ५० हजारांहून अधिक वाहने भंगारात निघणार आहेत. व्यावसायिक वाहनांकरिता १५, तर खासगी वाहनांकरिता २० वर्षे आयुर्मान केंद्राने निश्चित केले आहे.

खासगी वाहनांकरिता २० वर्षे आयुर्मान केंद्राने ठरविल्यामुळे पाच लाखांपैकी साडेतीन लाख वाहनांना काहीअंशी जीवदान मिळणार आहे. या नियमानुसार जिल्ह्यात आयुर्मान संपलेले ५४६ टॅक्सी, ११, ७६४ अ‍ॅटोरिक्षा, ९१ स्टेशन वॅगन, ३२ स्टेज कॅरियर्स, ३२ स्कूल बस, १७८ खासगी सेवा देणाऱ्या व्हॅन, ९१५१ ट्रॅक, लॉरी, ५९८ टँकर, ५४८८ चारचाकी मालवाहतूक व्हॅन, ४२६३ तीन चाकी मालवाहतूक वाहने, १३ हजार ९०५ ट्रॅक्टर, १४ हजार ८४७ ट्रॉली व अन्य इतर वाहने ६७८, आदी ७० हजार वाहने व इतर जिल्ह्यांतून ट्रॉन्सफर झालेली अशी एकूण दीड लाखाहून अधिक वाहने भंगारात जाणार आहेत. उर्वरित साडेतीन लाख वाहने टप्प्याटप्याने पाच वर्षात वयोमान संपेल त्याप्रमाणे भंगारात जाणार आहेत.

खासगी वाहने - ३ लाख ४५, ०००

व्यावसायिक वाहने - १ लाख ५५, ०००

आॅटोरिक्षा - ११ हजार ७६४

लॉरी, ट्रक - ९ हजार १५१

टँकर - ५९८

अन्य वाहने - १ लाख ३३, ४८७

खासगी वाहने

दुचाकी व मोटारकार - ३ लाख ६४ हजार ४००

नियम असा होता

यापूर्वी खासगी व मालवाहतूक वाहनांची आयुर्मान १५ वर्षे ओलांडले असले तरी त्या वाहनाच्या सुस्थितीवरून फिटनेस प्रमाणपत्र पुढील पाच वर्षांसाठी दिले जात होते. त्याकरिता ते वाहन प्रादेशिक अथवा उपप्रादेशिक परिवहनच्या कार्यालयात आणून त्याची तांत्रिक चाचणी मोटारवाहन निरीक्षक करीत होते, तर व्यावसायिक वाहनांकरिता नवीन वाहनांची दोन वर्षांनी आणि त्यानंतरच्या प्रत्येक वर्षी ही तपासणी करून फिटनेस प्रमाणपत्र दिले जात होते.

कोट

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्क्रॅप धोरणाचा सविस्तर आदेश व मार्गदर्शक सूचना आल्यानंतर त्याची अंमलबजावणी शासनाच्या सूचनेनुसार केली जाईल.

- डॉ. स्टीव्हन अल्वारीस, प्रादेशिक परिवहन अधिकारी,

Web Title: More than 1.5 lakh vehicles will be scrapped in the first phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.