डेक्कनच्या ‘रचनाभद्राय’ प्रदर्शनात १५० हून अधिक कलाकृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 07:58 PM2020-02-15T19:58:35+5:302020-02-15T19:58:50+5:30

कोल्हापूर येथील डेक्कन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीअंतर्गत डिग्री आणि डिप्लोमा इंटेरिअर डिझाईनविषयी महाविद्यालयात मुलांनी वर्षभरात तयार केलेल्या सजावटीच्या सुमारे १५० हून अधिक कलाकृती ‘रचनाभद्राय’ प्रदर्शनात सादर केल्या आहेत. येथील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये शनिवारपासून सुरू झालेले हे प्रदर्शन सोमवार (दि. १७) पर्यंत खुले राहणार आहे.

More than 3 artworks in Deccan's 'Anandabhadrai' exhibition | डेक्कनच्या ‘रचनाभद्राय’ प्रदर्शनात १५० हून अधिक कलाकृती

डेक्कन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीअंतर्गत डिग्री, डिप्लोमा इंटेरिअर डिझाईनविषयीच्या ‘रचनाभद्राय’ प्रदर्शनास शनिवारपासून प्रारंभ झाला. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सजावटीच्या विविध कलाकृती सादर केल्या.

googlenewsNext
ठळक मुद्देडेक्कनच्या ‘रचनाभद्राय’ प्रदर्शनात १५० हून अधिक कलाकृती

कोल्हापूर : येथील डेक्कन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीअंतर्गत डिग्री आणि डिप्लोमा इंटेरिअर डिझाईनविषयी महाविद्यालयात मुलांनी वर्षभरात तयार केलेल्या सजावटीच्या सुमारे १५० हून अधिक कलाकृती ‘रचनाभद्राय’ प्रदर्शनात सादर केल्या आहेत. येथील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये शनिवारपासून सुरू झालेले हे प्रदर्शन सोमवार (दि. १७) पर्यंत खुले राहणार आहे.

‘रचनाभद्राय’ या प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी, ग्राहकांच्या मनातील कल्पना ओळखून नवसंकल्पना सजविण्याचा प्रयत्न करावा. पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करून घरांची सजावट करावी, असा सल्ला दिला.

यावेळी आर्किटेक्ट प्रकाश चांडक यांच्यासह प्रमोद बेरी, सुभाष कुलकर्णी, आर. आर. जोशी, रमेश पोवार, प्रकाश देवलापूरकर, प्राचार्य सीमा मुलाणी, प्रांजली कुलकर्णी, निशिकांत गोखले तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

डेक्कन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीअंतर्गत डिग्री आणि डिप्लोमा इंटेरिअर डिझाईन याविषयी शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर या विषयाशी संबंधित विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध सजावटीच्या कलाकृतींचा या प्रदर्शनात समावेश केला आहे.


 

 

Web Title: More than 3 artworks in Deccan's 'Anandabhadrai' exhibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.